जळगाव- आठवड्याभरापासून बेपत्ता असलेल्या कोरोनाबाधित वृद्ध महिलेचा मृतदेह आज कुजलेल्या अवस्थेत स्वच्छतागृहात आढळून आला. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीला टांगली होती. या बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यासह 7 जणांना निलंबित करण्याचे आदेश आरोग्य संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिले आहेत. याबाबतची माहिती खासदार उन्मेश पाटील यांनी दिली आहे.
बेपत्ता कोरोनाबाधित महिला मृत्यू प्रकरण; जळगाव मेडिकल कॉलेजच्या डीनसह 7 निलंबित
कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य उपचार करत नसल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्यातच भूसावळ शहरातील 82 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा मृतदेह रुग्णालयातील शौचालयात आढळून आला. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीला टांगली होती.
कोविड रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य उपचार करत नसल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्यात आज भूसावळ शहरातील 82 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा मृतदेह रुग्णालयातील शौचालयात आढळून आला. राज्याच्या आरोग्य विभागाने या प्रकाराची तत्काळ दखल घेत कारवाई केली आहे.
कोरोनाबाधित महिलेचा रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात 5 दिवसांपासून मृतदेह पडून असल्याची घटना आज समोर आली. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली असून आरोग्य विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी त्याची दखल घेतली. त्यानंतर तडकाफडकी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैर यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक आणि 5 प्राध्यापकांना निलंबित करण्याची कारवाई केल्याची माहिती खासदार पाटील यांनी दिली.