महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणून महापौरांनी घेतली सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांची भेट - जळगाव जिल्हा बातमी

महानगरपालिकेने संयुक्त खात्यात निधी वर्ग करण्यासाठी आवश्यक पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावे यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : Jan 21, 2021, 5:01 PM IST

जळगाव -शहरातील विकासकामांसाठी आलेल्या 42 कोटींच्या कामाची वर्क ऑर्डर मक्तेदाराला देण्यात आली असून पालिकेने आपल्या हिश्शाची रक्कम देखील स्वतंत्र खात्यात वर्ग केली आहे. दरम्यान, संपूर्ण कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व जळगाव महानगरपालिकेचे संयुक्त खाते उघडणे आवश्यक आहे. महानगरपालिकेने संयुक्त खात्यात निधी वर्ग करण्यासाठी आवश्यक पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावे यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.

जळगाव शहरातील विकासकामांसाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत 42 कोटींची कामे मंजूर करण्यात आली होती. काही तांत्रिक कारणास्तव कामांना स्थगिती देण्यात आली होती. गेल्या आठवड्यात सर्व कामांची स्थगिती हटवून मक्तेदाराला कार्यादेश देण्यात आले आहेत. कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जळगाव महापालिकेचे स्वतंत्र संयुक्त बँक खाते उघडणे आवश्यक आहे. पालिकेच्या हिश्शाचा निधी संयुक्तिक खात्यात वर्ग करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पालिका प्रशासनाला पत्र देणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत महापौर भारती सोनवणे व नगरसेवकांनी त्यांना विनंती केली. दोन दिवसात दि.23 जानेवारी दुपारी 4 वाजेपर्यंत पत्र देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले.

हेही वाचा -जळगावातील वकिलाची अ‌ॅमेझाॅनला कायदेशीर नाेटीस

ABOUT THE AUTHOR

...view details