महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फर्निचरच्या दुकानाला भीषण आग, दुकान मालकाचे मोठे नुकसान

जळगाव येथील लाकडी फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या आगीत येथील दुकान जळून खाक झाले असून, दुकान मालकाचे सुमारे 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

फर्निचरच्या दुकानाला भीषण आग, दुकान मालकाचे सुमारे 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान
फर्निचरच्या दुकानाला भीषण आग, दुकान मालकाचे सुमारे 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान

By

Published : May 27, 2021, 9:26 PM IST

जळगाव -शहरातील नेरीनाका परिसरात असलेल्या लाकडी फर्निचरच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या आगीत येथील दुकान जळून खाक झाले असून, दुकान मालकाचे सुमारे 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

फर्निचरच्या दुकानाला भीषण आग, दुकान मालकाचे सुमारे 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान

दुकानात लाकडी साहित्य असल्याने आग भडकली

शहरातील सालारनगर भागातील रहिवासी असलेले दस्तगीर शाह रज्जाक शाह यांचे नेरीनाका परिसरात लाकडी फर्निचरचे दुकान आहे. या दुकानात ते जुने फर्निचर, जुने फ्रीज खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. याच दुकानाला गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. दुकानात लाकडी साहित्य असल्याने आगीने मोठ्या प्रमाणात भडका घेतला. दरम्यान, दुकानासमोरून जाणाऱ्या लोकांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

अग्निशामक दलाने आटोक्यात आणली आग

आग लागल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशामक दलाचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक बंबांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत दुकानातील मोठ्या प्रमाणात असलेले लाकडी साहित्य जळून खाक झाले होते. दरम्यान, दुकानाला कशामुळे आग लागली, याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या दुकानात इलेक्ट्रिकल कनेक्शन नव्हते. त्यामुळे शॉर्टसर्किटने आग लागलेली नाही, अशी माहिती दुकान मालक दस्तगीर शहा यांनी दिली. या घटनेची पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

हेही वाचा -धोका वाढला! व्हाइट फंगसमुळे आतड्यात पडले छिद्र; जगातील पहिलीच केस

ABOUT THE AUTHOR

...view details