जळगाव- दिवाळी आली की सर्वात आधी आठवण येते रोशणाईची. यासाठी जवळपास ४५ प्रकारच्या लाइट्स आणि दिव्यांच्या माळा तसेच अन्य सामग्री बाजारात दाखल झाली आहे. दिवाळी सात दिवसांवर आल्याने नागरिकांची साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. यंदा गोल्डन दिवे अन् झुंबरला जास्त पसंती मिळत आहे.
दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव, चैतन्याचा, आनंदाचा, समतेचा उत्सव. मांगल्याचे प्रतीक असलेले दिवे या दिवसांत घराबाहेर पणत्या, आकाशकंदील लावले जातात. सगळीकडे प्रकाशच प्रकाश असतो. घराला आकर्षक अशा लाइटिंगच्या माळींनी सजवले जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत छोटे इलेक्ट्रिशियन्सच दिव्यांची माळ तयार करून ते विकत होते. पण त्यानंतर दहा वर्षांपासून चायजीन दिवे आले. या चायनीज दिव्यांच्या माळेला मागील चार-पाच वर्षांपासून जोरदार मागणी आहे. या मागणीमुळे देशी पारंपरिक माळा तयार करणाऱ्यांचा व्यवसायच बुडाला होता. आता सध्या भारत-चीन यांच्यातील कटू संबंधांमुळे रोष व्यक्त केला जात आहे. देशी बनावटीच्या साहित्याची विक्री यंदा वाढली आहे, हे विशेष.
फुलांच्या एलइडी माळा