जळगाव -महानगर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार धुसफूस सुरू आहे. पक्षांतर्गत कुरघोड्या आणि स्थानिक नेतेमंडळीकडून राजकारण होत असल्याचा आरोप करत महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला. याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. अभिषेक पाटील यांच्यानंतर वेगवेगळ्या 12 फ्रंटल अध्यक्षांसह 300 कार्यकर्त्यांनी एकाच वेळी राजीनामे दिले असून, हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा 'सेट बॅक' मानला जात आहे.
- पदोन्नती की पंख छाटणी?
कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी आपला राजीनामा थेट पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली. पक्षाने पाटील यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करायचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, म्हणून प्रदेशकडून सूचित केले होते. अभिषेक पाटील हे महानगराध्यक्ष म्हणून उत्तमप्रकारे काम करत असताना त्यांना दूर करू नये, महानगराध्यक्ष म्हणून कायम ठेवावे, अशी मागणीही काही नेत्यांकडून करण्यात येत होती. मात्र, तरीही वरिष्ठ नेत्यांकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने वैतागून अभिषेक पाटील यांनीच आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाने त्यांना प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त करताना विश्वासात घेतलेले नाही. मग ही पदोन्नती आहे की पंख छाटणी? असा सवालही उपस्थित केला जात आहे. स्थानिक नेत्यांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारींमुळे आपल्याला काम करता येत नाही, असाही थेट आरोप पाटील यांनी केल्याने पक्षातील 'भाऊबंदकी' चव्हाट्यावर आली आहे.
- 12 फ्रंटल अध्यक्षांचे सामूहिक राजीनामे-
अभिषेक पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या 12 फ्रंटल अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यामध्ये उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कल्पना पाटील, युवक अध्यक्ष स्वप्निल नेमाडे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जितेंद्र चांगरे, पदवीधर विभागाचे अध्यक्ष अनिल पाटील, सचिव ऍड. कृणाल पवार, युवक कार्याध्यक्ष तुषार इंगळे, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय वंजारी, युवती अध्यक्षा आरोही नेवे, वक्ता सेलचे अध्यक्ष रमेश भोळे, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष गौरव लवंगले, ओबीसी सेलचे अध्यक्ष कौशल काकर, शिक्षक आघाडीचे प्रमुख हेमंत सोनार यांचा समावेश आहे.
हेही वाचा -Mumbai Nirbhaya Case : घटना निंदनीय, फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
- खडसे गटाच्या पुनर्वसनासाठी अभिषेक पाटलांचा बळी?