महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात बनावट नोटा बाळगणाऱ्यास अटक - बनावट नोटा बाळगणाऱ्याला अटक

जामनेर तालुक्यातील शहापूर येथे बनावट नोटा बाळगणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.

Sheikh Farooq Sheikh Nawab
शेख फारुख शेख नवाब

By

Published : Nov 1, 2020, 12:16 PM IST

जळगाव -पाचशे रुपयांच्या बनावट नोटा दैनंदिन व्यवहारात वापरणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ आरोपीला अटक केली. जामनेर तालुक्यातील शहापूर येथे ही कारवाई झाली. शेख फारुख शेख नवाब (वय ४० रा. शहापूर, ता. जामनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

प्रताप इंगळे, पोलीस निरीक्षक

जामनेर तालुक्यातील शहापूर येथील शेख फारुख शेख नवाब हा पाचशे रुपयांच्या बनावट नोटा दैनंदिन व्यवहारात वापरत होता. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शेख फारुख याला पकडण्यासाठी एका पंटरच्या माध्यमातून सापळा रचला. पोलिसांचा पंटर त्याच्याशी व्यवहार करण्याच्या बहाण्याने गेला. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहापूर शिवारातील एका शेतातून शेख फारुख शेख नवाबला रंगेहाथ अटक केली. त्याच्याकडून पाचशे रुपयाच्या २६ हजार ५०० रुपये, अशा ५३ बनावट भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या.

पंटरने डोक्यावरून हात फिरवताच घातली झडप

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेख फारुख याला पकडण्यासाठी पंटरची मदत घेतली. आरोपीसोबत आर्थिक व्यवहार पूर्ण होताच, डोक्यावरून हात फिरवण्याचा कोडवर्ड ठरला होता. त्यानुसार, व्यवहार झाल्यानंतर पंटरने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याचवेळी, साध्या वेशात असलेल्या पोलिसांनी आरोपीवर झडप घातली.

जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संशयित आरोपी शेख फारुख याच्याविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४८९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शेख फारुख याची कसून चौकशी सुरू आहे. बनावट नोटा बनवणारे एक रॅकेट जिल्ह्यात सक्रिय असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा-'होय मी श्वान, जनतेसोबत भ्रष्टाचार करणाऱ्यांचा चावा घेणार'

हेही वाचा-'जेम्स बाँड'ला अजरामर करणारे सीन कोनेरी काळाच्या पडद्याआड

ABOUT THE AUTHOR

...view details