जळगाव - महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज (1 मे) सकाळी 8 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच महाराष्ट्र दिनाचा ध्वजारोहण समारंभ फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याच उपस्थितीत पार पडला.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यावर्षी सुरक्षेच्या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांना ध्वजारोहण समारंभाला परवानगी नाकारण्यात आली होती. ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डाॅ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार रवी मोरे आदी उपस्थित होते.