जळगाव -शहरातील दोन भावंडांनी आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले आहे. सन्मुख (वय 19) व गौरी गणेश महाजन (वय 14) अशी सुवर्णपदक विजेत्या स्पर्धकांची नावे आहेत. या दोघांनी सप्टेंबर महिन्यात नेपाळ देशातील पोखरा येथे झालेल्या 'इंडो-नेपाळ इन्व्हीटेशनल इंटरनॅशनल चॅम्पियनशीप 2020-21' या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत आपली छाप पाडली. सन्मुख व गौरीच्या चमकदार कामगिरीमुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
- जगभरातून 39 स्पर्धक झाले होते सहभागी -
पंजाब राज्यातील अमृतसर येथे ऑगस्ट महिन्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील योगा स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत भारतातील 65 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या 19 स्पर्धकांची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी निवड झाली होती. जळगावातील सन्मुख व गौरी महाजन या भावंडांचा यात समावेश होता. नेपाळमधील पोखरा येथील कासकीच्या रंगशाळा स्टेडियममध्ये 14 ते 18 सप्टेंबर दरम्यान ही आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धा पार पडली. जगभरातील 39 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. भारताच्या 19 स्पर्धकांनी 13 सुवर्ण आणि 2 रौप्य पदके मिळवली. सन्मुख व गौरीने यातील 2 सुवर्णपदके पटकावली.
- जळगावच्या लौकिकात भर -
सन्मुख व गौरी हिने केलेल्या चमकदार कामगिरीमुळे जळगावचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले असून, शहराच्या लौकिकातही भर पडली आहे. सन्मुख हा पुण्यातील आकुर्डी येथील डी. वाय. पाटील इंजिनियरींग कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे, तर गौरी ही जळगावातील प. न. लुंकड कन्या शाळेत इयत्ता नववीत शिकत आहे. सन्मुख याने 19 वर्षाच्या आतील गटात तर गौरीने 14 वर्षाखालील वयोगटातून सुवर्णपदक प्राप्त केले. दोघांना डॉक्टर के जुमानी यांच्यासह वडील गणेश महाजन व आई भाग्यश्री महाजन यांनी मार्गदर्शन केले.
- अशी लागली दोघांना योगा व जिम्नॅस्टिकची गोडी -
सन्मुख व गौरीचे वडील गणेश महाजन हे जळगावातील ला. ना. शाळेत शिक्षक आहेत. लहानपणी ते सन्मुखला सर्कस पाहायला नेत असत. यावेळी सर्कशीत दाखवले जाणारे जिम्नॅस्टिकचे प्रकार पाहून सन्मुखला विशेष कौतुक वाटायचे. तेथूनच त्याला जिम्नॅस्टिकची गोडी लागली. वडील गणेश हे देखील स्पोर्ट्समन असल्याने त्यांनी सन्मुखला पाठबळ दिले. पुढे इयत्ता 8 वीत असताना त्याने शालेय स्तरापासून ते जिल्हा, राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली. त्याने आपली बहीण गौरीला देखील जिम्नॅस्टिक वळण्यास प्रवृत्त केले. नंतर दोघेही योगा शिकले. आता दोघे जण जिम्नॅस्टिक आणि योगामध्ये उत्तम सादरीकरण करतात. त्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत.
- गौरीला पहिल्याच स्पर्धेत नाकारली होती संधी... पण युक्ती शोधली आणि स्पर्धा गाजवली -