महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कडाक्याच्या थंडीचा केळीला फटका; 'चरका' आणि 'करपा' रोगाचा प्रादुर्भाव - चिलिंग इन्जुरी

जिल्ह्यात दरवर्षी 48 हजार ते 55 हजार हेक्टरवर केळीची लागवड होते. थंडीमुळे केळीवर आता चरका आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. चरका रोगामुळे कांदेबागाची वाढ खुंटल्यामुळे उत्पादनावर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. चरका रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.

कडाक्याच्या थंडीचा केळीला फटका
कडाक्याच्या थंडीचा केळीला फटका

By

Published : Jan 19, 2020, 4:12 AM IST

जळगाव - गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. तापमानाचा पारा 8 अंशांपर्यंत खाली आला आहे. कडाक्याचा थंडीमुळे रब्बीच्या पिकांना फायदा होत असला तरी केळीच्या पिकाला मात्र, मोठा फटका बसला आहे. केळीच्या कांदेबागांवर अतिथंडीमुळे 'चरका' रोगाचा (चिलिंग इन्जुरी) प्रादुर्भाव वाढला असल्याने कांदेबागांची वाढ खुंटली आहे. तर मृग बागांवरदेखील 'करपा' रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने हजारो हेक्टरवरील केळीचे पीक धोक्यात आले आहे.

कडाक्याच्या थंडीचा केळीला फटका

जिल्ह्यात दरवर्षी 48 हजार ते 55 हजार हेक्टरवर केळीची लागवड होते. थंडीमुळे केळीवर आता चरका आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. चरका रोगामुळे कांदेबागाची वाढ खुंटल्यामुळे उत्पादनावर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. चरका रोगाच्या प्रादुर्भावामुळे फळाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे व्यापारी केळी खरेदीसाठी अनुत्सूक आहेत. जिल्ह्यातील केळी बागांवर चरका रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अद्यापही कृषी विभागाकडून पाहणी दौरे झालेले नाहीत. चरका रोगाच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना कराव्यात, यासंदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

चरकामुळे ढासळते खोडाची अन्नप्रक्रिया

केळीचा खोडाकडून मुळाद्वारे जमिनीतील घटक अन्नप्रक्रियेत सामावून घेतले जातात. त्यामुळे केळीची वाढ होत असते. मात्र, अतिप्रमाणात पडणार्‍या थंडीमुळे ही अन्नप्रक्रिया ढासळली आहे. अशा परिस्थितीत खोडाचा पानाद्वारे अन्न मिळविण्याचा प्रयत्न असतो. मात्र 'चरका'च्या प्रादुर्भावामुळे पानाद्वारे जे घटक आवश्यक आहेत. ते घटक खोडाला उपलब्ध होवू शकत नाहीत. त्यामुळे केळीची पाने पिवळसर पडतात.

मृग बागांचेही नुकसान

थंडीच्या प्रादुर्भावामुळे केळीला मोठा फटका बसला आहे. कांदेबागासह मृग बागाचेही नुकसान झाले असून, कृषी विभागाने या ठिकाणी पंचनामे करण्याची गरज आहे. तसेच 'चरका'च्या प्रादुर्भावापासून बचावासाठी औषधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details