महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात भूमीगत गटारीच्या चेंबरच्या लोड टेस्टला सुरुवात; चेंबरने पेलला १७ टनाचा भार - जळगाव बातमी

भूमीगत गटारींच्या चेंबरचे काम योग्य नसून अनेक गैरसमज नागरिकांच्या मनात आहे. नागरिकांचे गैरसमज दूर करण्यासाठी बुधवारपासून चेंबरची लोड टेस्ट सुरू करण्यात आली.

underground sewer
जळगावात भूमीगत गटारीच्या चेंबरच्या लोड टेस्टला सुरुवात

By

Published : Feb 10, 2021, 7:10 PM IST

जळगाव -शहरात भूमीगत गटारींचे काम सुरू असून ठिकठिकाणी चेंबर तयार करण्यात आले आहे. भूमीगत गटारींच्या चेंबरचे काम योग्य नसून अनेक गैरसमज नागरिकांच्या मनात आहे. नागरिकांचे गैरसमज दूर करण्यासाठी बुधवारपासून चेंबरची लोड टेस्ट सुरू करण्यात आली. महापौर भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत चेंबरवर १७ टन वजनाचा भार तपासून पाहण्यात आला.

जळगावात भूमीगत गटारीच्या चेंबरच्या लोड टेस्टला सुरुवात

टेस्टला कानळदा रस्त्यापासून सुरुवात-

लोड टेस्टला कानळदा रस्त्यापासून सुरुवात करण्यात आली. यावेळी महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोले, भूमीगत गटारीच्या कामाचे मक्तेदार प्रतिनिधी आणि अभियंता उपस्थित होते

नागरिकांच्या मनात अनेक शंका, संभ्रम-

भूमीगत गटारींच्या कामाबाबत जळगावकर नागरिकांच्या मनात अनेक शंका आणि संभ्रम आहे. चेंबरवर पाणी न मारणे, वीट न भिजवता वापरणे, पाणी न मारणे, प्लास्टर न करणे, सिमेंट, वाळू कमी जास्त असणे, चेंबरचे झाकण, रिंग कमकुवत आहे अशा अनेक शंका आणि संभ्रम नागरिकांच्या मनात आहे.

चेंबरने पेलली १७ टन क्षमता-

भूमीगत गटारीसाठी गल्लोगल्ली चेंबर तयार करण्यात आले आहे. गल्लीतून शक्यतो अवजड वाहने जात नाही. तरीही चेंबरने १७ टन क्षमतेचा भार पेलला आहे. आजपर्यंत १० चेंबरची तपासणी पूर्ण झाली असून दररोज ५ चेंबर तपासले जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details