महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात कोविड सेंटरमध्ये रुग्णाने आणल्या मद्याच्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्या

कोरोना केंद्रामध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाने चक्क 4 मद्याच्या बाटल्या तसेच गुटख्याच्या पुड्या आतमध्ये आणल्या होत्या. मद्य पिऊन तो रुग्ण गोंधळ घालत होता. या प्रकाराची माहिती होताच महापौर भारती सोनवणे यांनी सेंटरमध्ये धाव घेत मद्यपी रुग्णाची कानउघाडणी केली.

जळगाव
जळगाव

By

Published : Mar 10, 2021, 6:35 PM IST

Updated : Mar 10, 2021, 7:22 PM IST

जळगाव- शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या मनपा कोविड केअर सेंटरमध्ये बुधवारी दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला. या सेंटरमध्ये दाखल असलेल्या एका रुग्णाने चक्क 4 मद्याच्या बाटल्या तसेच गुटख्याच्या पुड्या आतमध्ये आणल्या होत्या. मद्य पिऊन तो रुग्ण गोंधळ घातला होता. या प्रकाराची माहिती होताच महापौर भारती सोनवणे यांनी सेंटरमध्ये धाव घेत मद्यपी रुग्णाची कानउघाडणी केली.

जळगाव

मनपा कोविड केअर सेंटरमध्ये दररोज रुग्णांची संख्या वाढत असून, महापौर भारती सोनवणे सेंटरमध्ये भेट देऊन रुग्णांची विचारपूस करीत असतात. बुधवारी अविनाश पाटील नामक एक रुग्ण मद्य पिऊन गोंधळ घालत असल्याची माहिती महापौर सोनवणे यांना मिळाली. त्यानंतर त्या तत्काळ त्याठिकाणी पोहचल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ. विजय घोलप यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मद्यपी रुग्ण आईसह आहे दाखल-

मनपाच्या कोविड केअर सेंटर इमारत क्रमांक ४ मध्ये आईसह उपचारार्थ दाखल असलेल्या अविनाश पाटील या तरुणाने बाहेरून मद्याच्या 4 बाटल्या, गुटख्याच्या पुड्या आणल्या होत्या. महापौर सोनवणे यांनी मद्याच्या बाटल्या बाहेर काढण्यास सांगितले. यावेळी रुग्णाने गोंधळ घालत मला मद्य आणि गुटखा न दिल्यास मी आत्महत्या करून घेईल, अशी धमकी दिली.

गुटखा घेऊन पळाला, खोलीला लावली आतून कडी-

महापौर भारती सोनवणे या मद्यपी रुग्णाला खडसावत असतानाही त्याने मद्यप्राशन केलेले होते. महापौरांनी त्याला जाब विचारल्यानंतर त्याने टेबलावर ठेवलेली गुटख्याची पुडी उचलून वर पळ काढला आणि स्वतःच्या खोलीत जात आतून कडी लावून घेतली. मद्यपी इतक्यावरच थांबला नाही तर खोलीतून तो पुन्हा पुन्हा आत्महत्येची धमकी देत होता.

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल-

मनपा कोविड केअर सेंटरमध्ये मद्य पिऊन गोंधळ घालणाऱ्या अविनाश पाटील याच्यासह कोविड केअर सेंटरच्या बाहेर जाऊन परत येणारे गजानन काकडे, प्रसन्न सराफ या रुग्णांच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिसात डॉ. विजय घोलप यांच्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापौरांनी दिले होते.

Last Updated : Mar 10, 2021, 7:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details