महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात रविवारी २२ कोरोना बाधितांचा मृत्यू, १०५९ नवे पॉझिटिव्ह - जळगाव कोरोना बातमी

रविवारी दिवसभरात २२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, रविवारी नव्याने १०५९ रुग्ण बाधित झाले आहेत. बाधित रुग्णांची संख्या सव्वा लाखांच्या उंबरठ्यावर आहे.

Jalgaon corona
Jalgaon corona

By

Published : Apr 18, 2021, 9:36 PM IST

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यासोबतच दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचाही आकडा वाढतच आहे. रविवारी दिवसभरात २२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, रविवारी नव्याने १०५९ रुग्ण बाधित झाले आहेत.

बाधित रुग्णांची संख्या सव्वा लाखांच्या उंबरठ्यावर -

जिल्ह्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती अत्यंत गंभीर होत चालली आहे. आज दिवसभरात नव्याने १०५९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण बाधित रुग्णांची संख्या वाढून १ लाख ९ हजार २७७ इतकी झाली आहे. तर ९६ हजार १५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

असे आढळले रुग्ण -

आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर १९०, जळगाव ग्रामीण १२, भुसावळ १६१, अमळनेर २२, चोपडा १३२, पाचोरा ६६, भडगाव ५२, धरणगाव ४२, यावल ६५, एरंडोल ६७, जामनेर ६८, रावेर ३९, पारोळा ३७, चाळीसगाव ३६, मुक्ताईनगर ८, बोदवड ४९ आणि इतर जिल्ह्यातील १३ रुग्ण असे एकूण १०५९ रुग्ण आढळून आले आहेत. तर १०७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना बाधित २२ रुग्णांचा मृत्यू -

जिल्ह्यात आज २२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरात सर्वाधिक ७, एरंडोल तालुक्यात ४, पारोळा तालुक्यात ३, जामनेर आणि भुसावळ तालुक्यात प्रत्येकी २, अमळनेर, जळगाव, मुक्ताईनगर आणि भडगाव तालुक्यातील प्रत्येकी एक अशा एकूण २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details