जळगाव - महिला पोलीस कर्मचाऱ्याशी धक्काबुक्की करुन विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला नागरिकांना चोप दिला ( Citizens Beaten Journalist In Jalgaon ) आहे. जळगाव शहरातील नेरी नाका येथे ही घटना घडली. याप्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सलीमखान आरमान खान पठाण असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचारी नेरी नाका येथे कर्तव्यावर होत्या. तेव्हा सलीम खान महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे आला आणि एका अधिकाऱ्याच्या मोबाईल क्रमांकाची मागणी केली. तेव्हा आपल्याकाडे त्यांचा नंबर नसल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. तोच राग मनात धरत सलीम महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून आला. 'तेव्हा मी रिपोर्टर आहे, मी तुझी नोकरी घालवतो, तुझा साहेब मला सलाम करीन,' अशी धमकी दिली.