जळगावमहाविकास आघाडीमध्ये समविचारी जे वेगवेगळे पक्ष आहेत, ते आमच्याबरोबर आहेत आणि सर्व मिळून आम्ही काम करीत आहोत. मात्र,शिवसेनेने संभाजी ब्रिगेडशी केलेल्या युतीबाबत आजच माहिती मिळाली. त्यात काही वावगे वाटत नाही मात्र शिवसेना कोणाशी युती करीत Shiv Sena Alliance with Sambhaji Brigade असेल तर याबाबत भविष्यात चर्चा होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगावात दिली NCP State President Jayant Patil in Jalgaon आहे.
जयंत पाटील यांच जळगाव पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तंबीउद्धव ठाकरे यांना आपली ताकद दाखवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी सभासद संख्या वाढवा, अशी तंबी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यानी जळगाव पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी होणार व त्यामध्ये जर आपल्या मतदारसंघात जर सभासद संख्या कमी असेल, तर त्या जागेवर उद्धव ठाकरे म्हणतील की, या ठिकाणी आमचा उमेदवार द्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आपली ताकद दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त सभासद करण्याची तंबी यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगावात पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली आहे.
पक्ष बांधणीसाठी आघाडीच्या पक्षांची तयारीआघाडीतील पक्ष आपआपली पक्षाची बांधणीकरण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे आपली सभासदसंख्या जास्त कशी होईल याकडे सर्व पक्षांचे लक्ष आहे. नुकतेच शिवसेनेनेदेखील संभाजी ब्रिगेडशी युती करून आपली राजकीय वाटचाल दाखवून दिली आहे. जळगावात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, आपण आपली सभासद संख्या वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे सक्रिय कार्यकर्ते पक्षात असतील तरच पक्षाला त्या भागासाठी तिकीट मिळेल, अन्यथा त्या विभागावर आघाडीतील इतर पक्ष दावा सांगू शकतो. त्यामुळे आपण आपली सक्रिय कार्यकर्त्यांची फौज तयार केली पाहिजे. याकरिता पदाधिकाऱ्यांना त्यांनी तंबी दिली, आपली ताकद दाखवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची सभासद संख्या वाढवा.