महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात तपासणी पथकाने पकडली २९ लाखांची संशयित रोकड

नाक्यावर खासगी बसमधून प्रवास करणारा मोहम्मद शहजाद मोहम्मद इलियास (रा. खंडवा, मध्यप्रदेश) या व्यक्तीकडून २९ लाख १५ हजार २०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

जळगावात तपासणी पथकाने पकडली २९ लाखांची संशयित रोकड

By

Published : Oct 9, 2019, 6:49 PM IST

जळगाव- जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चोरवड गावाजवळील तपासणी नाक्यावर २९ लाख १५ हजार २०० रुपयांची संशयित रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोकड एका खासगी बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडून जप्त करण्यात आली आहे. ती रावेर तहसील कार्यालयातील कोषागारात जमा करण्यात आली आहे.

हेही वाचा-स्टेट बँकेकडून बचत करणाऱ्यांना झटका; ठेवीवरील व्याजदरात कपात

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेले चोरवड हे गाव महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या हद्दीवर आहे. या ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तपासणी नाका उभारण्यात आला आहे. या नाक्यावर खासगी बसमधून प्रवास करणारा मोहम्मद शहजाद मोहम्मद इलियास (रा. खंडवा, मध्यप्रदेश) या व्यक्तीकडून २९ लाख १५ हजार २०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही रक्कम जप्त करून रावेर तहसील कार्यालयात आणण्यात आली. तिथे ती मोजण्यात आली. ही रक्कम घेऊन मोहम्मद भुसावळला जात होता. रक्कम खासगी व्यवहाराची असल्याचे त्याने सांगितले. मात्र, अधिकारीवर्ग कागदपत्रांवरुन सत्यता पडताळून पाहत आहेत. रक्कम खासगी व्यवहाराची असल्याने पोलिसांनी संबंधित व्यापाऱ्यांकडून व्यवहाराची कागदपत्रे मागवली आहेत. त्यानंतर रकमेबाबत पोलीस पुढील निर्णय घेणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details