जळगाव - शहरातील एक सॉफ्टवेअर अभियंता तरुण अमेरिकेचा जावई झालाय, तर अमेरिकेची लेक जिल्ह्यातल्या सामान्य शेतकरी कुटुंबाची सून झाली आहे. समाज माध्यमावरील त्यांच्यातील ओळखीचे रुपांतर प्रेमात होऊन ते दोघे आज भारतीय रितीरिवाजाप्रमाणे सात फेरे घेवून विवाह बंधनात अडकले.
जळगावात आली फॉरेनची पाटलीन हेही वाचा -गायक मिका सिंगच्या मॅनेजरची रेकॉर्डिंग स्टुडिओत आत्महत्या
जळगावातील योगेश विठ्ठल माळी सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत असताना समाज माध्यमावरुन 'अॅना रेनवॉल' नावाच्या अमेरिकेतील तरुणीशी ओळख झाली. त्यानंतर त्यांची घट्ट मैत्री जमली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊन दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. अॅना तिच्या कुटुंबीयांसह जळगावला आली असून, भारतीय संस्कृती प्रमाणे आज दोघांनी विवाह केला.
योगेश अमेरिकेत नोकरीला...
योगेशने आपले प्राथमिक शिक्षण जळगावच्या विद्यानिकेतन शाळेतून पूर्ण केले त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण एम. जे. कॉलेज येथून तर अभियांत्रिकीचे शिक्षण पुण्याच्या शासकीय महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. योगेश 'एमएस इन कॉम्प्युटर'चे शिक्षण पूर्ण केल्यावर अमेरिकेतील नामवंत 'सॉफ्ट इन्फोनेट फार्मा' या कंपनीत नोकरी करू लागला. जॉब करत असतानाच समाज माध्यमातून मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या 'अॅना रेनवाल' या तरुणीशी मैत्री झाली होती.
भारतीय संस्कृतीचे कुतूहल -
अॅना लग्नासाठी जळगावला आल्यापासून पहिल्यांदाच सासू सुभद्रा, सासरे विठ्ठल माळी, दीर प्रशांत, नणंद कांचन जगदीश महाजन अशा कुटुंबीयांची गाठ भेट घडली. मराठी मुलींप्रमाणे अॅनाने भारतीय परंपरेनुसार राहणीमानात बदल केला असून, चुडीदार दुपट्टा, कपाळावर टिकली लावून दोन दिवसांपासून कुटुंबीयांत वावरत आहे. अपार्टमेंटमधील रहिवाशांतर्फे आलेल्या आमंत्रणाला वधू-वर जोडीने हजर राहून आशीर्वाद घेत आहेत. आज भारतीय संस्कृती प्रमाणे दोघांचा विवाह झाला. भारतीय रीतिरिवाज, परंपरेचे कुतूहल आणि त्याबद्दल आदर असल्याचे अॅनाने सांगितले.
हेही वाचा -पाकिस्तानातील लग्नाला शत्रुघ्न सिन्हांची हजेरी, झाले सोशल मीडियावर ट्रोल