महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव : जिल्हा रुग्णालयातील बोगस कोरोना रिपोर्ट प्रकरणात दोन जण दोषी - जळगाव जिल्हा रुग्णालय बोगस कोरोना अहवाल

जिल्हा रुग्णालयातील बोगस कोरोना रिपोर्ट प्रकरणात चौकशी समितीने चौकशी अहवाल सादर केला. यात दोन जण दोषी आढळले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

bogus corona report Jalgaon
बोगस कोरोना रिपोर्ट जळगाव जिल्हा रुग्णालय

By

Published : Feb 5, 2022, 7:59 PM IST

जळगाव -जिल्हा रुग्णालयातील बोगस कोरोना रिपोर्ट प्रकरणात चौकशी समितीने चौकशी अहवाल सादर केला. यात दोन जण दोषी आढळले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

माहिती देताना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद

हेही वाचा -जळगाव जिल्ह्यातील पशुवैद्यकीय रुग्णालये सलाईनवर, शेतकऱ्यांना गैरसोय

जळगावातील एका नामांकित माध्यमाने स्टिंग ऑपरेशन करून जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या बोगस कोरोना तपासणी अहवाल प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. यात सुरक्षारक्षक कोरोनाचा निगेटिव्ह असल्याचा अहवाल मिळवून देण्यासाठी तीनशे ते चारशे रुपये घेत असल्याचेही समोर आले होते. तसेच, या प्रकरणाची स्टिंग करणार्‍या प्रतिनिधींनी चित्रीकरणही केले होते.

संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानुसार या प्रकरणाच्या चौकशीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या अध्यक्षतेखाली तीन अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली होती. समितीतील अधिकार्‍यांकडून कोरोनाच्या लॅबपासून तर विविध पातळीवर दोन दिवस चौकशी करण्यात आली. यात कोरोना आरटीपीसीआर चाचणीची पद्धत, अहवाल कसा तयार होतो, किती वेळात तयार होतो, याप्रमाणे सखोल चौकशी करण्यात येवून प्रयोगशाळेचे सूक्ष्मजीव विभागप्रमुख यांच्यासह इतर असे वीस पेक्षा जास्त लोकांचे जबाब घेण्यात आले. दोन दिवसांच्या चौकशीचा अहवाल समितीने आज अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना सादर केला. या अहवालात संशयित आरोपी सुरक्षारक्षक राजेंद्र विठलं पाटील (दुर्गे), डाटा एन्ट्री ऑपरेटर स्वप्नील पाटील हे दोघे दोशी आढळून आलेत, अशी माहिती डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.

हेही वाचा -White Water Rafting : सहिष्णा ठरली सर्वात लहान 'व्हाइट वाटर रिव्हर राफ्टिंग' करणारी पहिली मुलगी

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details