महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव: जिल्ह्यात आज ४०८ कोरोनाबाधितांची नोंद

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा रविवारी पुन्हा विस्फोट झाला आहे. दिवसभरात नव्याने ४०८ रुग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरातील सर्वाधिक १९१ रुग्णांचा समावेश आहे. तर दिवसभरात जळगाव शहरातील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ६०८७८ वर पोहोचला आहे. त्यापैकी ५६९८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात आज ४०८ कोरोनाबाधितांची नोंद
जिल्ह्यात आज ४०८ कोरोनाबाधितांची नोंद

By

Published : Feb 28, 2021, 9:44 PM IST

जळगाव -जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा रविवारी पुन्हा विस्फोट झाला आहे. दिवसभरात नव्याने ४०८ रुग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरातील सर्वाधिक १९१ रुग्णांचा समावेश आहे. तर दिवसभरात जळगाव शहरातील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ६०८७८ वर पोहोचला आहे. त्यापैकी ५६९८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आजची आकडेवारी

जळगाव जिल्ह्यात आज तब्बल 408 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यात जळगाव शहरातील 191 कोरोनाबाधितांचा समावेश आहे. जळगाव शहर- १९१, जळगाव ग्रामीण- ४, भुसावळ- २१, अमळनेर- २०, चोपडा- ५२, पाचोरा- १३, भडगाव- ५, धरणगाव- ९, यावल- २, जामनेर- ३३, रावेर- ७, पारोळा- १२, चाळीसगाव- १५, मुक्ताईनगर-१८, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील २ असे आज एकूण जिल्ह्यात ४०८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

कोनामुळे आतापर्यंत १ हजार ३८५ रुग्णांचा मृत्यू

जिल्हा कोवीड रुग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६० हजार ८७८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५६ हजार ९८८ रुग्ण बरे होवून घरी परतले आहे. सध्या जिल्ह्यात २ हजार ५०५ रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत १ हजार ३८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details