जळगाव -कोरोनामुळे राज्य परिवहन मंडळाची बससेवा सध्या बंद आहे. परिणामी सर्व एसटी कर्मचारीही घरीच बसून आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पगार नसल्याने जळगाव विभागातील दोन महिला कर्मचाऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी ‘पराठा सेंटर’ सुरू केले आहे. खर्च वगळता दोघींना दिवसाकाठी प्रत्येकी १५० ते २०० रुपये मिळतात. त्यातून त्या आपला घरखर्च चालवत आहेत.
पहिल्या लॉकडाऊनपासून ते आजपर्यंत राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंदच आहे. कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार मिळालेले नाहीत. त्यामुळे अनेकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातील लिपीक राखी शर्मा व राज्यातील पहिली महिला कंडक्टर(वाहक) अशी ओळख असलेल्या रजनी मेघे या दोघींनी बहिणाबाई चौधरी उद्यानाजवळ गेल्या पंधरा दिवसांपासून ‘पराठा सेंटर’ सुरू केले आहे. भांडवल नसल्याने त्यांनी गॅस सिलिंडर, टेबल, खुर्च्यांची घरूनच जुळवाजुळव केली आहे. दिवसाकाठी सुमारे ७०० रुपयांचे पराठे विकले जातात. खर्च वगळता दोघींना प्रत्येकी १५० ते २०० रुपये मिळतात.
आत्मनिर्भर होण्यावर भर -