जळगाव -जिल्ह्यातील रावेर शहर गतकाळात घडलेल्या दंगलीच्या कारणावरून वादग्रस्त ठरले आहे. भविष्यात दंगल घडू नये, रावेर शहरात शांतता अबाधित रहावी, यासाठी जिल्हा पोलीस दलाने एमपीडीए कायद्यान्वये रावेरातील पाच उपद्रवी संशयितांना एका वर्षासाठी नाशिक येथील कारागृहात स्थानबद्ध केले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
रावेर येथील 5 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई; नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी - जळगाव पोलीस अधीक्षक बातमी
जळगावातील संवेदनशील असलेल्या रावेर शहरात आतापर्यंत अनेक दंगलीच्या घटना घडल्या आहेत. अशा गुन्ह्यांना आळा बसावा, म्हणून पोलीस प्रशासनाने ५ जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. या पाचही संशयित गुन्हेगारांचा स्थानबद्ध करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी आज आदेश काढले.
रावेर शहर हे अतिशय संवेदनशील शहर आहे. याठिकाणी अनेकदा जातीय दंगलीच्या घटना घडल्या आहेत. रावेर शहराचा हा इतिहास पाहता अशा गुन्ह्यांना आळा बसावा, म्हणून पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली आहे. जातीय दंगलीचे गुन्हे घडवून आणणाऱ्या संशयित गुन्हेगारांवर कारवाई करून शहरात शांतता ठेवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. याच अनुषंगाने शहरातील पाच संशयितांना एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी काढले आहे.
या पाच संशयितांना केले स्थानबद्ध-
मधुकर उर्फ मधू पैलवान रामभाऊ शिंदे (वय ६२, रा. शिवाजी चौक, रावेर), स्वप्निल मनोहर पाटील-महाजन (वय २६, रा. बक्षीपूर, ता. रावेर), शेख मकबुल अहमद शेख मोईनोद्दीन (वय ५७, रा. मन्यारवाडा, रावेर), शेख कालु शेख नुरा (वय ५३, रा. मन्यारवाडा, रावेर) आणि आदिलखान उर्फ राजू बशिरखान (वय २२, रा. फुकटपुरा, रावेर) यांच्यावर एक वर्षांकरीता स्थानबद्धची कारवाई केली आहे.
या पाचही संशयित गुन्हेगारांचा स्थानबद्ध करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी आज आदेश काढले. पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, पो.नि. रामदास वाकोडे, सपोनि शितल नाईक, पोउनि संदीप पाटील, मनोज वाघमारे, पो.शि. दत्तात्रय बडगुजर, किरण चौधरी, पो.ना. महेश महाजन, स.फौ. राजेंद्र करोडपती, विजय जावरे, पो.ना. नंदू महाजन, महेंद्र सुरवाडे, ज्ञानेश्वर चौधरी, तुषार मोरे, सुरेश मेढे, जितेंद्र पाटील, मंदार पाटील, पुरुषोत्तम पाटील, मनोज म्हस्के, निलेश लेहार, इस्माईल शेख, भरत सोपे, नितीन झांबरे, जितेंद्र जैन यांनी संबंधित पाचही गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांना एका वर्षासाठी नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे.