महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव: केंद्रीय मंत्री दानवेंच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध; प्रतिकात्मक पुतळ्याला फासलं शेण - जळगाव शिवसेना न्यूज

रावसाहेब दानवे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी दानवे यांचा फोटो लावलेल्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत, शेण फासत संताप व्यक्त केला.

jalgaon shivsena slam raosaheb danve over his statement on farmers protest
जळगाव: केंद्रीय मंत्री दानवेंच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध; फोटो लावलेल्या प्रतिकात्मक पुतळ्याला फासलं शेण

By

Published : Dec 12, 2020, 1:33 PM IST

जळगाव -केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनासंदर्भात दोन दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने शनिवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलना प्रसंगी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी रावसाहेब दानवे यांचा फोटो लावलेल्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत, शेण फासत संताप व्यक्त केला.

जळगावातील महापालिका इमारतीसमोर शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, महिला कार्यकर्त्या शोभा चौधरी, सरिता माळी आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

गुलाबराव वाघ बोलताना....
काय म्हणाले होते दानवे?केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्ह्यातील एका गावात आरोग्य केंद्राचे उद्घाटन करताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या आंदोलनात शेतकरी नसून दुसरेच लोक आहेत. पाकिस्तान आणि चीनकडून या आंदोलनाला पाठिंबा दिला जात असल्याचे वक्तव्य केले होते. दानवे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. त्या अनुषंगाने आज जळगावात शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.महिला कार्यकर्ते आक्रमकआंदोलन प्रसंगी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्या भरवल्या. त्याचप्रमाणे सर्व आंदोलकांनी दानवे यांच्या पुतळ्याला शेण फासत त्यांना आता तरी अक्कल येईल, अशा संतप्त भावना व्यक्त केल्या. भाजपाचे मंत्री नेहमी प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.

इंधन दरवाढीचाही नोंदवला निषेध
या आंदोलन प्रसंगी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला. पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हेही वाचा -जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींसाठी आचारसंहिता लागू; सरपंचासाठी आरक्षण सोडत

हेही वाचा -जळगावात तिहेरी अपघातात दोन जण गंभीर; ट्रकचालकासह क्लिनरला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details