जळगाव : केळी हे जवळपास सगळ्यांचे आवडीचे फळ आहे. त्याचा उपयोग खाण्यापासुन तर पूजेपर्यंत सगळ्या गोष्टींसाठी होतो. केळी हाच खरा कल्पवृक्ष आहे. जगात जळगाव जिल्ह्याची ओळख केळीचे आगार म्हणून होते, ही गौरवास्पद बाब आहे. जळगावची केळी, नवतंत्रज्ञानयुक्त टिश्युकल्चरची केळी भारत आणि भारताबाहेर प्रसिद्ध आहे. याचे सगळे श्रेय जळगावच्या केळी उत्पादक भूमिपुत्रांना जात असल्याचे प्रतिपादन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. जळगावच्या गांधी उद्यानात, पोस्टाच्या पाकिटावरील (Jalgaon Postal Department issued) जळगाच्या केळीचे चित्र असलेल्या पाकिटाचे प्रकाशन (special wallet with a picture of a banana) करण्यात आले.
Jalgaon Postal Department : टपाल विभागाकडून केळीचे चित्र असलेले विशेष पाकीट जारी - Jalgaon Postal Department issued
जळगावच्या गांधी उद्यानात, पोस्टाच्या पाकिटावरील (Jalgaon Postal Department issued) जळगाच्या केळीचे चित्र असलेल्या पाकिटाचे प्रकाशन (special wallet with a picture of a banana) करण्यात आले. जगात जळगाव जिल्ह्याची ओळख केळीचे आगार म्हणून आहे.
केळी उत्पादकांत आनंद : जळगाव च्या गांधी उद्यानात, पोस्टाच्या पाकिटावरील जळगाच्या केळीचे चित्र असलेल्या पाकिटाचे प्रकाशन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. केळी उत्पादकांच्या जीवनात आनंद फुलवण्याचे कार्य जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांनी केले व ते तंत्रज्ञान सगळ्यांना उपलब्ध करून दिले. आज जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्याने पिकवलेली केळी जीआय मानांकन मिळवून विश्वाच्या पटलावर आली. केळी उत्पादकांना याचे श्रेय द्यायला हवे, म्हणूनच आपण डाक विभागाबरोबर पाठपुरावा करत केळीचे चित्र व माहिती असलेले पाकीट प्रकाशित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदर्शनाचे आयोजन :ऑल इंडिया बनाना ग्रोवर्स असोसिएशनचे सचिव वसंतराव महाजन, डाक विभागाचे अधीक्षक बी. व्ही. चव्हाण, निसर्गराजा कृषीविज्ञान केंद्राचे अध्यक्ष शशांक पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. आश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले. गांधी उद्यानात 'डाक तिकिटात महात्मा' या प्रदर्शनाचे मंगळवारी आयोजन केले होते. यात महात्मा गांधींवरील १२० देशांनी काढलेली टपाल तिकिटे दर्शवण्यात आली होती. केळीवरील हे विशेष पाकीट गांधी रिसर्च फाउंडेशनने जैन टिश्युकल्चर यांच्या मदतीने तयार केले आहे. या पाकिटाच्या ४००० प्रति तयार करण्यात आल्या आहे. लवकरच जनसामान्यांसाठी गांधीतीर्थ आणि टपाल कार्यालयात ही पाकिटे उपलब्ध होतील.