जळगाव -कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी असली तरीही तळीराम आणि दारू विक्रेत्यांना तीळमात्र फरक पडलेला नाही. सर्वदूर गावठी, देशी-विदेशी दारूची सर्रास विक्री आणि जुगाराचे अड्डे सुरू आहेत. यावर कारवाई व्हावी, अशी मागणी पुढे येताच जिल्ह्यातील जामनेर पोलिसांनी भुसावळ रोडवर कांग नदी पुलाजवळील जुगाराचा अड्डा जाळला. त्या बाजूलाच दारू विक्री करणाऱ्या तिघांना पकडून त्यांची पोलीस ठाण्यापर्यंत पायी धिंड काढली.
जामनेरात तीन दारू विक्रेत्यांची पोलिसांनी काढली धिंड! - जळगाव दारू विक्री धींड
कांग नदीच्या पुलाजवळ सुरू असलेल्या जुगाराच्या क्लबवर जामनेर पोलिसांनी धाड टाकून तेथील तंबू जाळून टाकला. बाजूलाच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून गावठी दारूची विक्री सुरू असल्याचे समजले. दारू विक्रेत्या तिघांना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदीचा अपवाद वगळता घराबाहेर पडू नये. वस्तू खरेदी करताना सुरक्षीत अंतर पाळावे, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. त्यास अनेक ठिकाणी हरताळ फासला जातो. विशेषत: जुगाराचे अड्डे, दारू विक्रेते कोणासही जुमानण्यास तयार नाही. असाच प्रकार जामनेरात सुरू असल्याचे कळताच पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या पथकाने धडक मोहीम राबवली.
कांग नदीच्या पुलाजवळ सुरू असलेल्या जुगाराच्या क्लबवर धाड टाकून तेथील तंबू जाळून टाकला. बाजूलाच प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून गावठी दारूची विक्री सुरू असल्याचे समजले. दारू विक्रेत्या तिघांना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. एवढेच नव्हे तर त्यांची पोलीस ठाण्यापर्यंत पायी धिंड काढली. जामनेर पोलिसांच्या कृतीचे स्वागत केले जात आहे. या प्रकारची कारवाई यापुढेही अशीच सुरू रहावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.