जळगाव -शहर, जिल्ह्यात अवैध वाळु वाहतूक बेफामपणे सुरू आहे. अशात स्थानिक गुन्हे शाखेच्या गस्तीपथकाने पाठलाग करुन एक वाळुचे डंपर २५ ऑक्टोबरला रात्री शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडले. या प्रकरणी डंपरमालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी पाठलाग करुन पकडले अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर, तिघांवर गुन्हा - जळगाव पोलीस बातमी
डंपरचालक शेख रईस शेख रऊफ (वय २३) शेख शाबीर शेख युनूस (वय १९, रा. ख्वाजा चौक आव्हाणे) यांना अटक करण्यात आली. हे डंपर भुषण सपकाळे (पूर्ण नाव माहित नाही, खेडी, ता. जळगाव) याच्या मालकीचे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार शेखर रईस, शेख शाबीर व भुषण सपकाळे या तिघांच्या विरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी, की स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ममुराबाद रस्त्यावर गस्त करत होते. यावेळी ममुराबादकडून विना क्रमांकाच्या डंपरमधून अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यानुसार पथकाने प्रजापतनगरजवळ डंपरचालकास थांबवण्याचा इशारा दिला. परंतू, चालकाने पोलिसांचे पथक पाहुन अधिक वेगाने डंपर पळवले. पाेलिसांच्या पथकाने पाठलाग करुन शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भिलपुरा चौकीजवळ हा डंपर अडवला. चौकशी केली असता डंपरमधून विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले.
डंपरचालक शेख रईस शेख रऊफ (वय २३) शेख शाबीर शेख युनूस (वय १९, रा. ख्वाजा चौक आव्हाणे) यांना अटक करण्यात आली. हे डंपर भुषण सपकाळे (पूर्ण नाव माहित नाही, खेडी, ता. जळगाव) याच्या मालकीचे असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार शेखर रईस, शेख शाबीर व भुषण सपकाळे या तिघांच्या विरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक, विजय पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन यांच्या पथकाने ही कारवाई केली. किरण पाठक पुढील तपास करत आहेत.