जळगाव -कोरोना पॉझिटिव्ह तसेच संशयित रुग्णांनी आपल्या घरात रोकड, दागिने आणि मौल्यवान वस्तू ठेवू नये, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे. कोरोना संशयित तसेच पॉझिटिव्ह रुग्णांसह त्यांच्या संपर्कातील नातेवाईकांना क्वारंटाईन केले जात असल्याने घरे बंद असतात. हीच संधी साधून चोरटे चोरी करत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी खबरदारी म्हणून हे आवाहन केले आहे.
एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याला उपचारासाठी व घरातील इतर सदस्यांना रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात येते. या काळात घर बंद असल्याची संधी साधून घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले आहे. या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे, असे जळगाव पोलिसांनी सांगितले.