जळगाव - महानगरपालिकेत नेहमी सत्ताधारी भाजपला शहरातील समस्यांबाबत घेरणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी शुक्रवारी महासभा सुरू होण्याअगोदर महापौर भारती सोनवणे यांना आश्चर्याचा धक्का दिला. महापौरांच्या कार्यकाळातील ही अखेरची महासभा असल्याने व त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध कामांबाबत शिवसेना नगरसेवकांकडून महापौरांचा जाहीर सत्कार करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात महापौरांचे स्वागत करण्यात आले. फेटा घालून, महापौरांना शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून महासभा सुरू होण्याआधी सत्कार केला.
१८ मार्च रोजी महापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपणार आहे. शुक्रवारी झालेली महासभा ही कदाचित महापौर म्हणून भारती सोनवणे यांनी अखेरची महासभा असण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेना नगरसेवकांनी कोणतीही पुर्वसूचना न देता, अचानकपणे महापौरांचा सत्कार करण्याचे नियोजन केले होते. महापौरांचे आपल्या दालनात आगमण झाल्यानंतर ढोल-ताशांचा गजर करण्यात आला. अचानकपणे केलेल्या या नियोजनाचा महापौरांसह भाजपच्या सर्वच नगरसेवकांना आश्वर्याचा धक्का बसला.
विरोधकांकडून पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांचा केलेल्या कामांसाठी सत्कार -