जळगाव- देशात नव्याने सुरू करण्यात येत असलेल्या सहा 'न्यू फ्लाईंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट'पैकी एक प्रशिक्षण संस्था जळगाव विमानतळावर सुरू करण्यात येणार आहे. पंतप्रधान कार्यालय व भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांच्या कार्यालयातून प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रात जळगावचा समावेश असल्याची माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.
रायबरेली येथे सर्वात आधी 'फ्लाईंग ट्रेनिंग' देणारे देशातील पहिले फ्लाईंग ट्रेनिंग सेंटर सुरू केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात गोंदिया येथे 'फ्लाईंग ट्रेनिंग' सेंटर २००८ मध्ये सुरू झाले. आता पंतप्रधान कार्यालय व भारतीय विमान प्राधिकरणाने नवीन सहा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट देण्याचा मानस व्यक्त केला आहे.
नाईट लँडिंग सुविधेसह परिपूर्ण