महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लसीकरणासाठी घाई न करता सहकार्य करा; पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे आवाहन - गुलाबराव पाटील कोरोना लसीकरण सहकार्य मागणी

ज्यांची नोंदणी होईल, त्यांनीच लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लस घ्यावी. इतरांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी न करता सहकार्य करावे, असे आवाहन जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नागरिकांना केले आहे.

Minister Gulabrao Patil on corona vaccination
गुलाबराव पाटील जळगाव नागरिक लसीकरण आवाहन

By

Published : May 1, 2021, 11:26 AM IST

जळगाव - राज्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण आजपासून सुरू होणार असल्याने नागरिकांनी आपली नोंदणी कोविन ॲपवर करावी. ज्यांची नोंदणी होईल, त्यांनीच लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लस घ्यावी. इतरांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सहकार्य करावे. 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू असून त्यांनी केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासीयांना केले.

लसीकरणासाठी घाई न करता सहकार्य करण्याचे आवाहन जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी, प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार सुरेश थोरात, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. तर पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीताची धुन वाजविली.

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले

लवकर कोरोनावर मात करू -

जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजना व नागरिकांच्या सहकार्याने जिल्हा लवकरच कोरोनावर मात करेल, असा विश्वासही मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यक्रमानंतर बोलताना व्यक्त केला. कोरोनाच्या नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details