जळगाव -महाराष्ट्रातील बर्ड फ्ल्यू प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात जिल्हा सनियंत्रण समिती व तालुकास्तरावर सनियंत्रण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्याचा दुरध्वनी क्र. 0257-2958200/2262808 हा असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. ए. डी. पाटील यांनी दिली आहे.
स्थलांतरीत पक्ष्यांशी संपर्क टाळावा
जिल्ह्यात शीघ्र कृती दलाच्या 30 टिम स्थापन करण्यात आल्या असून, त्यांना आवश्यक ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील पोल्ट्रीफार्मला क्षेत्रीयस्तरावरील अधिकारी भेटी देवून मालकांना जैविक सुरक्षेबाबत मार्गदर्शन करत आहेत. पक्षी मालकांनी आपल्या कुक्कुट पक्ष्यांचा स्थलांतरीत पक्ष्यांशी संपर्क टाळावा, कुक्कुट पक्ष्यात असाधारण मरतूक आढळल्यास त्वरीत जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.