महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्याचा बारावीचा निकाल 89.72 टक्के; यावर्षीही मुलींनीच मारली बाजी - जळगाव बारावी निकाल बातमी

जळगाव जिल्ह्याचा बारावीचा एकूण निकाल 89.72 टक्के इतका लागला आहे. प्रविष्ट झालेल्या 46 हजार 964 विद्यार्थ्यांपैकी 42 हजार 137 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी विज्ञान शाखेतून सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

celebrate the results
celebrate the results

By

Published : Jul 16, 2020, 2:42 PM IST

जळगाव- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी ते मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी ऑनलाइन जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात आला. यावर्षी जळगाव जिल्ह्याचा एकूण निकाल 89.72 टक्के इतका लागला आहे. प्रविष्ट झालेल्या 46 हजार 964 विद्यार्थ्यांपैकी 42 हजार 137 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी विज्ञान शाखेतून सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी जळगाव जिल्ह्यातील 47 हजार 137 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 46 हजार 964 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून 42 हजार 137 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याची एकूण टक्केवारी 89.72 टक्के इतकी आहे. विज्ञान, कला, वाणिज्य आणि व्होकेशनल अशा शाखेतून परीक्षा देणाऱ्या एकूण 46 हजार 964 विद्यार्थ्यांपैकी 3 हजार 208 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह तर 18 हजार 316 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 19 हजार 639 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

जळगाव जिल्ह्याच्या निकालात विज्ञान शाखेचा सर्वाधिक 96.95 टक्के निकाल लागला आहे. त्याखालोखाल 93.18 टक्के निकाल वाणिज्य शाखेचा, व्होकेशनलचा 85.62 टक्के तर सर्वात कमी म्हणजेच 81.53 टक्के निकाल हा कला शाखेचा लागला आहे. विज्ञान शाखेतून 19 हजार 719 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात 19 हजार 118 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 2 हजार 172 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.

मुली ठरल्या मुलांपेक्षा वरचढ

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या बारावी परीक्षेत देखील मुलींनीच बाजी मारत मुलांपेक्षा आम्हीच हुशार असल्याचे दाखवून दिले आहे. नाशिक विभागात उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींची टक्‍केवारी 92.54 टक्‍के तर मुलांची टक्‍केवारी 86.09 टक्‍के आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यात मुलींची टक्केवारी 92.91 तर मुलांची टक्केवारी 87.45 इतकी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details