ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाची महिला वाहतूक पोलिसाशी हुज्जत; दंड भरण्यावरून झाला वाद - राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे हे शहरातील महात्मा फुले मार्केटकडून काँग्रेस भवनाच्या दिशेने त्यांच्या चारचाकी कारने जात होते. त्यांनी सीटबेल्ट लावलेला नव्हता. यामुळे टॉवर चौकात ड्यूटीवर असलेल्या महिला वाहतूक पोलिसाने त्यांना कार थांबवण्यास सांगितले.

jalgaon
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षाची महिला वाहतूक पोलिसाशी हुज्जत
author img

By

Published : Oct 2, 2020, 5:48 PM IST

जळगाव - येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी एका महिला वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालत अरेरावी केल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी टॉवर चौकात घडला. स्वप्निल नेमाडे असे महिला पोलिसाशी अरेरावी करणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाचे नाव आहे. कार चालवताना सीट बेल्ट न लावल्याने दंड आकारण्याच्या कारणावरून हा वाद झाला. वाद वाढल्याने पोलीस ठाण्यापर्यंत गेला होता. परंतु, नंतर आपापसातील समजुतीने वाद मिटला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षाची महिला वाहतूक पोलिसाशी हुज्जत

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे हे शहरातील महात्मा फुले मार्केटकडून काँग्रेस भवनाच्या दिशेने त्यांच्या चारचाकी कारने जात होते. त्यांनी सीटबेल्ट लावलेला नव्हता. यामुळे टॉवर चौकात ड्यूटीवर असलेल्या महिला वाहतूक पोलिसाने त्यांना कार थांबवण्यास सांगितले. नेमाडे यांनी कार थांबवल्यानंतर सीटबेल्ट न घातल्याबद्दल दंड भरा, असे महिला पोलिसाने सांगितले. त्यावर स्वप्निल नेमाडे यांनी त्या महिला पोलिसाला तुम्हाला मीच दिसलो का? इतर अनेक जण विना सीटबेल्ट वाहने नेतात. तुम्ही त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही. हे चुकीचे आहे. असे सांगत वाद घातला.

अरेरावी करत त्यांनी दंड न भरणार असल्याची भूमिकाही घेतली. मात्र, महिला वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करण्यावर ठाम असल्याने वाद वाढला. यावेळी नेमाडे यांनी संतापाच्या भरात कारची चावी पोलिसाच्या अंगावर फेकल्याचेही सांगितले जात आहे.

नंतर महिला वाहतूक पोलिसाने नेमाडे यांना शहर पोलीस ठाण्यात कार नेण्यास सांगितले. शहर पोलीस ठाण्यात आल्यानंतर महिला पोलिसाने पोलीस निरीक्षक अरूण निकम यांच्यापुढे घडलेला प्रकार सांगितला. यावेळी शहर पोलीस ठाण्यात गर्दी जमा झाली होती. बराच वेळ झाल्यानंतर आपापसातील समजुतीने वाद मिटला. त्यानंतर नेमाडे यांनी दंड भरला. त्यामुळे याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details