जळगाव- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या 154 उमेदवारांपैकी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील 54 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार मतदारसंघासाठी एकूण 100 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. मतदार संघनिहाय निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची संख्या (कंसात माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या)
जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघात 100 उमेदवार रिंगणात - जामनेर
जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या 154 उमेदवारांपैकी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील 54 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार मतदारसंघासाठी एकूण 100 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.
संग्रहित छायाचित्र
चोपडा -8 (10), रावेर-10 (4), भुसावळ-12 (9), जळगाव शहर-13 (8), जळगाव ग्रामीण-11 (4), अमळनेर-7 (4), एरंडोल-8, (0), चाळीसगाव-8 (5), पाचोरा-7 (0), जामनेर-9 (5), मुक्ताईनगर-7 (5) याप्रमाणे आहे.