जळगाव -एचडीएफसी बँकेत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली म्हसावद येथील तरुणाची ९३ हजार रूपयांची फसवणूक करणार्याला जळगाव सायबर क्राईमच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
बँकेचे बनावट नियुक्तीपत्र पाठवून फसवणूक
म्हसावद येथील सचिन संजय मराठे या बेरोजगार युवकाने नोकरी मिळण्यासाठी ऑनलाइन जॉब वेबसाईटवर नोंदणी केली होती. त्याला १२ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०१८ रोजी रवीसिंग, करण भातपूर, संग्राम भालेराव, करण लुत्रा, अनुभूती तनेजा, अनिल सिंग व श्रेया अशी नावे सांगणार्या व्यक्तींनी मोबाइलवर कॉल करुन संपर्क साधला. त्याला एचडीएफसी बँकेत नोकरीला लावण्याचे आमिष देऊन वेगवेगळ्या कारणांसाठी ९३ हजार रुपये त्याच्याकडून घेतले. तसेच बँकेचे बनावट नियुक्तीपत्र पाठवून फसवणूक केली. या प्रकरणी मराठे याच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा -राजकारणाला गुन्हेगारीचे ग्रहण! अनेक लोकप्रतिनिधींवर गंभीर गुन्हे!