महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावातील कोविड रुग्णालयात खाटा नाहीत; रुग्णांना अन्यत्र हलवण्याची वेळ - जळगाव कोरोना पेशंट

येत्या दोन दिवसांत रुग्णालयातील बेड रिकामे होतील. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असते. ही रुटीन प्रोसेस आहे. सोमवारी सर्व बेड फुल्ल असले तरी, मंगळवारी, बुधवारी काही रुग्णांचा डिस्चार्ज होणार आहे. तेव्हा बेड रिकामे होतील. त्यामुळे परिस्थिती पुन्हा नियंत्रणात येईल, अशी माहिती कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली आहे.

jalgaon covid hospitals are full of patients
जळगावातील कोविड रुग्णालयात खाटा नाही

By

Published : Sep 7, 2020, 6:17 PM IST

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. खासगीसह शासकीय कोविड सेंटरदेखील फुल्ल झाले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोविड केंद्रात सोमवारी सर्व ३५६ बेड फुल्ल झाले. त्यामुळे नवीन रुग्णांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात येत आहे. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती राहणार आहे.

कोविड रुग्णालयात वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता काही दिवसांपासून बेड वाढवण्यात आले होते. केंद्र शासनाने देखील काही व्हेंटिलेटर पाठवून दिलासा दिला होता. कोविड रुग्णालयात सुसज्ज असे ३५६ बेड तयार होते. पण नव्याने रुग्ण दाखल करून घेण्यासाठी बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे नव्याने येणाऱ्या रुग्णांसाठी आता इतर कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात येत आहे. तेथील स्थितीदेखील तपासण्यात येते आहे.

५ व ६ सप्टेंबर या दोन दिवसांत १ हजार ९०० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे यातील गंभीर रुग्णांनादेखील अ‍ॅडमिट करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. मारुती पोटे यांनी संपूर्ण कोविड रुग्णालयाची पाहणी केली. या वेळी सर्व ३५६ बेड फुल्ल असल्याचे निदर्शनास आले आहे. यातील कोणत्या रुग्णांना डिस्चार्ज देता येऊ शकतो? याची तपासणी करण्यात आली. पुढीत दोन दिवसांत डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर आहे.

जळगावातील कोविड रुग्णालयात खाटा नाही

येत्या दोन दिवसांत रुग्णालयातील बेड रिकामे होतील. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असते. ही रुटीन प्रोसेस आहे. सोमवारी सर्व बेड फुल्ल असले तरी मंगळवारी, बुधवारी काही रुग्णांचा डिस्चार्ज होणार आहे. तेव्हा बेड रिकामे होतील. त्यामुळे परिस्थिती पुन्हा नियंत्रणात येईल अशी माहिती कोविड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details