जळगाव -कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस व नववर्ष स्वागत ३१ डिसेंबर या उत्सवांच्या कालावधीत जळगाव शहर महापालिका हद्दीत केवळ रात्री ८ ते रात्री १० या वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी राहील, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे.
नियम माेडले तर कारवाई होणार -
आदेशाचे काटेकोरपणे पालन हाेते की नाही याची तपासणी करण्याचे अधिकार पोलीस विभाग व जळगाव महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना प्रदान करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिताचे कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहिल, असे आदेशात नमूद केले आहे. नियम माेडले तर थेट कारवाई केली जाणार आहे.