महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव शहर वाहतूक शाखेतर्फे वर्षभरात 30 हजार वाहनधारकांवर कारवाई - जळगाव शहर वाहतूक शाखा

शहर वाहतूक शाखेतर्फे गेल्या वर्षभरात नियम मोडणाऱ्या तब्बल 30 हजार 521 वाहनांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना शिस्त लागावी, या उद्देशाने ही मोहीम सुरूच आहे.

jalgaon city police
जळगाव शहर पोलीस

By

Published : Feb 5, 2020, 8:51 PM IST

जळगाव- शहर वाहतूक शाखेतर्फे गेल्या वर्षभरात नियम मोडणाऱ्या तब्बल 30 हजार 521 वाहनांवर कारवाईचा दंडुका उगारण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना शिस्त लागावी, या उद्देशाने ही मोहीम सुरूच आहे. वर्षभरात बेशिस्त वाहनचालकांकडून सुमारे 75 लाख 79 हजार 750 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 2018 च्या तुलनेत मागील वर्षभरात कारवाईची संख्या 1 हजार 103 ने वाढली असून 14 लाख 41 हजार 550 रुपयांचा अधिकचा दंड वसूल करण्यात आला आहे.

जळगाव शहर वाहतूक शाखेतर्फे वर्षभरात 30 हजार वाहनधारकांवर कारवाई

हेही वाचा -'काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर करत आहे'

पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक देवीदास कुनगर व त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत कारवाईची मोहीम राबवण्यात आली. त्यात वाहन चालवताना मोबाईलवर बोलणाऱ्या 1 हजार 427 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 2 लाख 85 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या 185 जणांवर ड्रक अँण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. या तळीरामांकडून 2 लाख 62 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

एक राज्य एक चलन-

राज्यात 20 मे 2019 पासून वन स्टेट वन चलन (एक राज्य एक चलन) ही कार्यप्रणाली लागू झाली असून जी.एन. पावती बंद करण्यात आली आहे. त्याशिवाय जळगाव, भुसावळ, चाळीसगाव येथे एम स्वॅप मशीनद्वारे वाहतूक केसेस केल्या जात आहेत. दरम्यान, 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये ड्रक अँण्ड ड्राईव्हच्या कारवाईची संख्या 85 ने वाढली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details