महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MARYTR MANGALISINGH PARDESHI सेवापूर्तीला केवळ एक वर्ष शिल्लक असतानाच जवानाला पठाणकोटमध्ये वीरमरण - etv bharat marathi

जवान मंगलसिंग परदेशी हे '३९ ईएमई'मध्ये नायक पदावर कार्यरत होते. सेवापूर्तीला केवळ एक वर्ष शिल्लक असतानाच त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर मूळगावी सावखेडा बुद्रुकला मंगळवारी (१४ ऑक्टोबर) सकाळी साडेनऊ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

मंगलसिंग परदेशी
मंगलसिंग परदेशी

By

Published : Nov 15, 2021, 9:54 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथील जवान मंगलसिंग जयसिंग परदेशी (वय ३६) यांना पठाणकोट येथे (MARYTR MANGALISINGH PARDESHI) वीरमरण झाले. शनिवारी (१३ ऑक्टोबर) ही घटना घडली. कर्तव्यावर असताना ते बंदुकीची गोळी लागून गंभीर जखमी झाले होते.



जवान मंगलसिंग परदेशी हे '३९ ईएमई'मध्ये नायक पदावर कार्यरत होते. सेवापूर्तीला केवळ एक वर्ष शिल्लक असतानाच त्यांना वीरमरण आले. त्यांचे प्राथमिक शिक्षण सावखेडा बुद्रुक जि.प. शाळेत, तर वरखेडी विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. वयाच्या १८व्या वर्षीच ते सैन्यदलात भरती झाले होते.

हेही वाचा-Manipur terror attack : कर्नल त्रिपाठी, पत्नी, ८ वर्षांच्या चिमुकल्यासह ७ जणांचा मृत्यू

सेवानिवृत्तीनंतरचे नियोजन राहिले स्वप्नच-

मंगलसिंग यांनी भुसावळ येथे नवीन घराचे बांधकाम केले होते. सेवानिवृत्तीनंतर नवीन घरात राहायला जाण्याचे त्यांचे स्वप्न होते. पण आता ते स्वप्न अपूर्णच राहिले. दसऱ्याच्या काळात ते सुटीवर आले होते. सुटी पूर्ण झाल्यानंतर ते नुकतेच पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते. त्यानंतर लगेचच ही दुर्दैवी घटना घडली. मंगलसिंग यांच्या पश्चात आई-वडील, दोन मोठे भाऊ, पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे.

हेही वाचा-Amit Shah in Tirupati : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दक्षिण विभागीय परिषदेची बैठक सुरू

गावातील यात्रेला येणार म्हणून सांगितले आणि असे अघटित घडले!

मंगलसिंग यांनी शनिवारी रात्री त्यांच्या चुलत भावाच्या मुलाला फोन लावून कुटुंबीयांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर काही तासातच ही घटना घडली. मंगलसिंग यांनी यावेळी आपण जानेवारी महिन्यात गावाच्या भैरवनाथ महाराजांच्या यात्रेला येणार असल्याचेही सांगितले होते.

हेही वाचा-milind teltumbde death मिलिंद तेलतुंबडे याच्या खात्म्याने तीन राज्यांना फायदा होणार - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details