जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प आहे. अशा परिस्थितीत राजस्थानमधील माऊंटअबू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये वार्षिक शिबिरासाठी गेलेले जळगाव जिल्ह्यातील सुमारे 85 भाविक तेथेच अडकून पडले आहेत. राज्यभरातील भाविकांच्या संख्येचा विचार केला तर, ही संख्या सुमारे अडीच हजारांच्या घरात आहे. माऊंटअबूत अडकलेल्या भाविकांना घरी परत आणण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी या भाविकांच्या कुटुंबीयांकडून होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील 85 भाविक माऊंटअबूत अडकले; कुटुंबीयांची चिंता वाढली - ८५ भाविक माऊंटअबूत अडकले
जळगाव जिल्ह्यातील शेकडो भाविक दरवर्षी राजस्थानातील माऊंटअबू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये वार्षिक शिबिरासाठी जात असतात. यावर्षी जिल्ह्यातील सुमारे 85 भाविक मार्च महिन्यात माऊंटअबूला गेले आहेत. त्यात एकट्या एरंडोल तालुक्यातील 32 भाविक आहेत. परंतु, नेमकं याचवेळी भारतात कोरोनाचा संसर्ग वाढला. त्यामुळे कोरोनाच्या नियंत्रणासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. अशा परिस्थितीत माऊंटअबूला गेलेले भाविक घरी परत येऊ शकले नाहीत.
जळगाव जिल्ह्यातील शेकडो भाविक दरवर्षी राजस्थानातील माऊंटअबू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटरमध्ये वार्षिक शिबिरासाठी जात असतात. यावर्षी जिल्ह्यातील सुमारे 85 भाविक मार्च महिन्यात माऊंटअबूला गेले आहेत. त्यात एकट्या एरंडोल तालुक्यातील 32 भाविक आहेत. परंतु, नेमकं याचवेळी भारतात कोरोनाचा संसर्ग वाढला. त्यामुळे कोरोनाच्या नियंत्रणासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. अशा परिस्थितीत माऊंटअबूला गेलेले भाविक घरी परत येऊ शकले नाहीत. अडकलेल्या भाविकांमध्ये बहुसंख्य भाविक ज्येष्ठ महिला आहेत. अनेकांना उच्च रक्तदाब, मधुमेह, अशा प्रकारच्या व्याधी आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून एकाच ठिकाणी अडकून पडल्याने ते सर्वजण हताश झाले आहेत. शिवाय त्यांच्या कुटुंबीयांची देखील चिंता वाढली आहे. माऊंटअबूत अडकून पडलेल्या भाविकांना घरी परत आणण्यासाठी राज्य सरकारने काही तरी प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे.
माऊंटअबूत अडकून पडलेल्यांमध्ये बहुसंख्य भाविक हे वयोवृद्ध आहेत. अनेकांना दुर्धर आजार आहेत. दीड महिन्यांपासून अडकून पडल्याने त्यांची मानसिक स्थिती ढासळली आहे. हवं तर प्रशासनाने या भाविकांना परत आणल्यावर त्यांची वैद्यकीय तपासणी करावी. त्यानंतर गरज असेपर्यंत क्वारंटाईन करावं मगच घरी सोडावं, अशी याचना त्यांचे कुटुंबीय करत आहेत. याप्रश्नी प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे, अशी मागणी देखील त्यांच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे.