जळगाव -जळगावात काल ( 16 जुलै ) धरणगाव नंतर आज ( 17 जुलै ) पुन्हा शिवसेनेला खिंडार पडली आहे. शिवसेनेच्या 32 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच, माजी मंञी गुलाबराव पाटील यांना समर्थन दर्शवले आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात ( jalgaon 32 shivsainik resign party ) आहे.
Shivsena : शिवसेनेची गळती थांबेना, जळगावातील शिवसैनिकांचा शिंदे गटाला पाठिंबा - जळगावातील शिवसैनिकांचा शिंदे गटाला पाठिंबा
जळगावात शिवसेनेच्या 32 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले जात ( jalgaon 32 shivsainik resign party ) आहे.
जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, यांच्यासह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व तालुक्यातील पदाधिकारी असे एकूण 32 शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्याकडे एकत्रितरित्या सामूहिक राजीनामे दिले. राजीनामा देणाऱ्यांमध्ये उपजिल्हाप्रमुख, शहर प्रमुख, तालुकाप्रमुख, विभागप्रमुख यांच्यासह काही माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जाहीर पाठींबा देण्यात आला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने जळगावातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
हेही वाचा -Sanjay Raut : 'पक्षाच्या कार्यकर्त्या आहात, नेत्या नाही'; संजय राऊतांनी दिपाली सय्यदांना खडसावलं