ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाऊबीजेच्या मुहूर्तावर श्रीसंत मुक्ताबाईंना ज्ञानेश्वर माऊलींकडून साडीचोळी अर्पण - jalgao muktaibai offered sacred saree

भाऊबीजेच्या मुहूर्तावर श्रीसंत मुक्ताबाईंना ज्ञानेश्वर माऊलींकडून आलेली साडीचोळी अर्पण करण्यात आली. संस्थानचे मुख्य पुजारी हभप रवींद्र महाराज हरणे यांनी पूजा-विधी पूर्ण केला. संतश्रेष्ठ ज्ञानोबा दादांकडून आलेली साडीचोळी भाऊबीजेनिमित्त मुक्ताईस नेसवण्यात आली. यावेळी वारकरी तसेच भाविकांची उपस्थिती होती.

Jalgaon_muktainagar bhaubeej celebration
कोथळी मुक्ताबाईंना साडीचोळी अर्पण
author img

By

Published : Nov 16, 2020, 12:07 PM IST

जळगाव -भाऊबीजेच्या मुहूर्तावर श्रीसंत मुक्ताबाईंना ज्ञानेश्वर माऊलींकडून आलेली साडीचोळी अर्पण करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील श्री क्षेत्र कोथळी याठिकाणी हा सोहळा पार पडला. लॉकडाऊनमुळे गेल्या साडेचार महिन्यांपासून राज्यभरातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळे बंद होती. राज्यसरकारने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे खुली केल्याने मुक्ताई मंदिर देखील आज पहाटेपासून भाविकांसाठी खुले झाले.

कोथळी मुक्ताबाईंना साडीचोळी अर्पण

कोथळी हे तीर्थक्षेत्र श्रीसंत मुक्ताबाई यांचे समाधीस्थळ आहे. भाऊबीजेच्या पर्वावर आज पहाटेपासून मुक्ताई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटे ४ वाजता काकडा आरती झाली. त्यानंतर संत मुक्ताईस संस्थानचे अध्यक्ष अ‌ॅड. रवींद्र पाटील यांच्याहस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी संस्थानचे मुख्य पुजारी हभप रवींद्र महाराज हरणे यांनी पूजा-विधी पूर्ण केला. संतश्रेष्ठ ज्ञानोबा दादांकडून आलेली साडीचोळी भाऊबीजेनिमित्त मुक्ताईस नेसवण्यात आली. यावेळी वारकरी तसेच भाविकांची उपस्थिती होती.
दरवर्षी भाऊबीज सोहळा
भाऊबीजेच्या मुहूर्तावर दरवर्षी हा सोहळा पार पडत असतो. आषाढी एकादशी सोहळ्यानंतर श्रीसंत मुक्ताबाईंना ज्ञानेश्वर माऊलींकडून आलेली साडीचोळी भाऊबीजेला अर्पण करण्यात येते. या सोहळ्याला जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील वारकरी तसेच भाविकांची उपस्थिती असते.

भाविकांनी स्वयंशिस्तीने दर्शन घेण्याचे आवाहन
सोहळ्यानंतर संस्थानचे अध्यक्ष अ‌ॅड. रवींद्र पाटील यांनी वारकरी तसेच भाविकांना स्वयंशिस्तीने मुक्ताईंचे दर्शन घेण्याचे आवाहन केले. राज्य सरकारने भाऊबीजेच्या मुहूर्तावर मंदिरे व धार्मिक स्थळे खुली केल्याने त्यांनी सरकारचे आभारही व्यक्त केले. दरम्यान, हभप रवींद्र महाराज हरणे म्हणाले की, जेव्हा संत ज्ञानेश्वर ताटी बंद करून बसले होते, तेव्हा श्रीसंत मुक्ताईंनी त्यांना विनंती करून ताटी उघडण्यास सांगितले होते. आज कोरोना महामारीच्या काळातही संत मुक्ताईंच्या आशीर्वादानेच मंदिरे उघडली आहेत, अशी भावना हभप हरणे यांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details