महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुद्धी पाहून शासकीय कर्मचाऱ्यांना पगार द्या - इंदुरीकर महाराज - सरकारी अधिकारी पगार इंदुरीकर महाराज प्रतिक्रिया

शासकीय कार्यपद्धती, अधिकारी व त्यांची वेतनश्रेणी यावरूनही इंदुरीकर महाराज ( Indurikar Maharaj on government officers salary ) यांनी लक्ष वेधले. जे काम करत नाही त्यांचा पगार ( Government officers salary Indurikar Maharaj comment ) जास्त आणि जे काम करतात त्यांना पगार कमी, असे म्हणत विभागाने जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला कर्मचाऱ्यांची बुद्धी मोजली पाहिजे व त्यानुसार पगार ठरवला पाहिजे, असे इंदुरीकर महाराज म्हणाले.

government officers salary Indurikar Maharaj comment
इंदुरीकर महाराज

By

Published : Jun 6, 2022, 12:44 PM IST

जळगाव - जळगावात गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदुरीकर महाराज ( Indurikar Maharaj on government officers salary ) यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंदुरीकर महाराजांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या ( Government officers salary Indurikar Maharaj comment ) पगाराकडे जनतेचे लक्ष वेधले. विभागाने जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला कर्मचाऱ्यांची बुद्धी मोजून त्यानुसार पगार ठरवला पाहिजे, असा सल्ला इंदुरीकर महाराज यांनी दिला. तसेच, कोरोना काळात जे ऑनलाईन पास झाले त्यांना पुढे नोकरी मिळणार नाही. आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे, जो कष्ट करतो त्याला पगार कमी मिळते, अशी विधानेही त्यांनी केली.

बोलताना इंदुरीकर महाराज

हेही वाचा -Jalgaon Low Hight Couple Wedding : अखेर ३६ इंच संदीपला मिळाली, ३१ इंची उज्ज्वलाची साथ, जळगावात पार पडला विवाह

बुद्धी पाहून शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार ठरवा -शासकीय कार्यपद्धती, अधिकारी व त्यांची वेतनश्रेणी यावरूनही इंदुरीकर महाराज यांनी लक्ष वेधले. जे काम करत नाही त्यांचा पगार जास्त आणि जे काम करतात त्यांना पगार कमी, असे म्हणत विभागाने जानेवारी महिन्याच्या पहिल्या तारखेला कर्मचाऱ्यांची बुद्धी मोजली पाहिजे व त्यानुसार पगार ठरवला पाहिजे, असे वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केले.

मोबाईलचा अतिरेक त्यामुळे शाळेकरी विद्यार्थी शिक्षणापासून दुरावत चालले आहे तर दुसरीकडे त्याचे दुष्परिणाम समोर येत आहे. अल्पवयीन मुली पळून जात असल्याचे उदाहरण देत त्यांनी या भीषण परिस्थिती वर उपस्थितांचे लक्ष वेधले. तरुण पिढी इतकी दारूच्या आहारी गेली आहे की त्यामुळे दारूचा खप वाढला आहे भविष्यात या तरुणांना लग्नासाठी मुली मिळणार नाहीत अशी मिश्किली ही यावेळी इंदुरिकर महाराजांनी केली. कोरोना काळात पोलिस होते म्हणून आपण सुरक्षित राहू शकले. कोरोना पोलिसांची कामगिरी मोलाची आहे. पोलिसांचे कार्य महान आहे असे म्हणत पोलीस विभागाचे इंदुरीकर महाराजांनी कौतुक केले.

मोबाईलचा अतिरेक यामुळे तरुण तसेच शाळेकरी मुले शिक्षणापासून दुरावले आहेत. याचे भविष्यात मोठे दुष्परिणाम पाहायला मिळणार असून, यावरून इंदुरीकर महाराजांनी तरुणांसह त्यांच्या पालकांची चांगलीच कान उघाडणी केली. आजच्या महाविद्यालयीन तरुणांबरोबरच विद्यार्थी हे मोबाईल व्यसनांच्या आहारी गेले आहेत. शाळेकरी मुले फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमांचा वापर करत आहे. यासर्व गोष्टींचा परिणाम मुलांच्या संस्कारावर पडले असून त्यातून विपरीत घटना घडत आहे. याच बाबींना अनुसरून इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून प्रबोधन करत विद्यार्थी तरुणांसह त्यांच्या पालकांना लक्ष केले.

हेही वाचा -Chalisgaon Police Dance : पोलीस निरीक्षक के.के.पाटील पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; पोलीस ठाण्याच्या आवारात धरला डीजेवर ठेका

ABOUT THE AUTHOR

...view details