जळगाव -जिल्ह्यासाठी रविवार (20 जून) हा दिवस खूपच आशादायी आणि दिलासादायक ठरला. कारण कोरोनाची दुसरी लाट उसळल्यानंतर रविवारी पहिल्यांदा कोरोनाने जिल्ह्यात एकही बळी गेला नाही. यापूर्वी 19 फेब्रुवारी 2021 रोजी कोरोना बळींची संख्या शून्य इतकी नोंदवली गेली होती. त्यानंतर तब्बल 4 महिन्यांनी हा दिवस उजाडला.
हेही वाचा -... म्हणून गॅंग प्रमुखाच्या नादाला लागू नका'; गुलाबराव पाटलांचा मुनगंटीवारांना टोला
जिल्ह्यात साधारणपणे फेब्रुवारीच्या अखेरीस कोरोनाची दुसरी लाट उसळली होती. एप्रिल आणि मे महिन्यात तर कोरोनाने अक्षरशः कहर माजवला होता. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र होती. या लाटेत वयोवृद्धांसह तरुणांच्या मृत्यूच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. या लाटेच्या काळात जिल्ह्यात एका दिवसाला 22 ते 24 रुग्णांचा मृत्यू होत होता. जसजशी लाट ओसरू लागली, तसतसे मृत्यूचे प्रमाणही कमी झाले होते. रविवारी दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासा देणारी ठरली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 568 मृत्यूची नोंद