जळगाव - एकतर्फी प्रेमातून तरुणीचा निर्घृण खून झाल्याची घटना घडल्याने भुसावळ शहर हादरले आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. प्रीती ओंकार बांगर (२२) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी प्रवीण विष्णू इंगळे (२७, रा. राहुल नगर, भुसावळ) याला अटक केली आहे.
एकतर्फी प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीचा घरात घुसून निर्घृण खून; संशयित अटकेत - DySP Gajana Rathod
सुरुवातीला चाकुचे वार झाल्यावर प्रीतीने शेजारील एका घरात बचावासाठी आश्रय घेतला. परंतु, डोक्यात सैतान शिरलेल्या प्रवीणने प्रीतीला घराच्या बाहेर काढून तिच्यावर परत चाकूने वार केले.
तरुणी ही भुसावळ शहरातील हुडको कॉलनीत राहत होती. तिच्यावर आरोपी प्रवीण इंगळे याचे एकतर्फी प्रेम होते. प्रीतीने प्रेमास नकार दिल्याच्या रागातून प्रवीणने तिच्यावर चाकूने वार केले.सुरुवातीला चाकुचे वार झाल्यावर प्रीतीने शेजारील एका घरात बचावासाठी आश्रय घेतला. परंतु, डोक्यात सैतान शिरलेल्या प्रवीणने प्रीतीला घराच्या बाहेर काढून तिच्यावर परत चाकूने वार केले. अतिरक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.
शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच जिल्हा उपपोलीस अधीक्षक गजानन राठोड, पोलीस निरीक्षक बाबासाहेब तांबे आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संशयित प्रवीणला अटक केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनेमुळे भुसावळ शहरातील तरुणी व महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.