जळगाव -कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने सर्वत्र शुकशुकाट आहे. याच शांततेचा फायदा घेऊन काही अज्ञात लाकूड तस्करांनी 50 ते 52 डेरेदार वृक्षांची कत्तल केली आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील गिरडगाव शिवारात हा प्रकार घडला आहे. शुक्रवारी दुपारी हा प्रकार उजेडात आला. त्यानंतर निसर्गप्रेमी नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गिरडगाव शिवारात 50 डेरेदार वृक्षांची कत्तल; अज्ञात लाकूड तस्करांचे कृत्य - illegal tree cutting in jalgaon
यावल तालुक्यातील गिरडगाव शिवारात लघु सिंचन विभागाचा पाझर तलाव आहे. या तलावाच्या काठावर असंख्य डेरेदार वृक्ष आहेत. कोरोनामुळे सध्या या पाझर तलावाच्या परिसरात शुकशुकाट आहे. याच बाबीचा फायदा घेऊन काही अज्ञात लाकूड तस्करांनी झाडांची कत्तल केली.
![गिरडगाव शिवारात 50 डेरेदार वृक्षांची कत्तल; अज्ञात लाकूड तस्करांचे कृत्य illegal tree cutting in jalgaon](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6835187-294-6835187-1587141118820.jpg)
यावल तालुक्यातील गिरडगाव शिवारात लघू सिंचन विभागाचा पाझर तलाव आहे. या तलावाच्या काठावर असंख्य डेरेदार वृक्ष आहेत. कोरोनामुळे सध्या या पाझर तलावाच्या परिसरात शुकशुकाट आहे. याच बाबीचा फायदा घेऊन काही अज्ञात लाकूड तस्करांनी याठिकाणी 50 ते 52 डेरेदार वृक्षांची कत्तल केली आहे. शुक्रवारी हा प्रकार उजेडात आला. या प्रकाराची माहिती मिळताच गिरडगावचे पोलीस पाटील अशोक पाटील, उपसरपंच आनंदा पाटील तसेच सरपंच पती मधुकर पाटील यांनी ग्रामसेवक बी. पी. फालक यांना घटनेबाबत कळवले. सर्वांनी पाझर तलाव परिसरात फिरून पाहणी केली. तेथे झाडांची कत्तल केल्याचे समोर आले.
दरम्यान, ही कत्तल कोणी केली? केव्हा केली? याची माहिती होऊ शकली नाही. या प्रकारासंदर्भात ग्रामस्थांनी तहसीलदार जितेंद्र कुंवर यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र, उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.