जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाने कासोदा ता. एरंडोल येथे बनावट देशी मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत राहुल अनिल चौधरी (रा. कासोदा) याला पथकाने अटक केली असून त्याच्याकडून पावणेचार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कासोद्यात बनावट देशी मद्यनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त; एक अटकेत - दारूचा कारखाना उद्ध्वस्त जळगाव बातमी
राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज सकाळी कासोदा-कनाशी रस्त्यावर नाल्याकाठी सुरू असलेला दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला. यावेळी ३ लाख ६९ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली.
कासोदा येथे बनावट देशी मद्य तयार करून ते टेम्पोमधून इतर गावांमध्ये पोहोचवली जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांना मिळाली होती. त्यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने रविवारी सकाळी कासोदा-कनाशी रस्त्यावर नाल्याकाठी सुरू असलेला दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला. यावेळी तयार केलेल्या दारूचे १४ बॉक्स, लेबल्स, बूच, रिकाम्या बाटल्या व टेम्पो असा ३ लाख ६९ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संशयित राहुल यास अटक करून एरंडोल न्यायालयात हजर करण्यात आले.
TAGGED:
Jalgaon liquor news