जळगाव - महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलकर्णी हे याआधी मुंबई नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक या पदावर होते. कुलकर्णी पुढच्या आठवड्यात आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
जळगाव मनपा आयुक्तपदी सतीश कुलकर्णी; पुढच्या आठवड्यात पदभार स्वीकारण्याची शक्यता - jalgaon mnc satish kulkarni
जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तत्कालीन आयुक्त डॉ. उदय टेकाळे 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांचा पदभार जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे सोपवला होता. दरम्यान, 12 फेब्रुवारी रोजी पालिका आयुक्तपदी आयएएस डॉ. माधवी खोडे-चवरे यांच्या नियुक्तीचे आदेश पालिकेला प्राप्त झाले होते. मात्र, 30 दिवस उलटले तरी त्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने मुंबई येथील नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे उपसंचालक सतीश कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे. सेवानिवृत्तीला दीड वर्ष शिल्लक असलेले कुलकर्णी पुढच्या आठवड्यात आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. ते मनपाचे ३८ वे आयुक्त असतील. महिनाभरात दुसऱ्यांचा आयुक्तांची नियुक्ती झाली.
हेही वाचा -अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, पालिका आयुक्तांचे पोलीस आयुक्तांना पत्र