जळगाव - जिल्ह्यातील एरंडोल येथील एक महिला माऊंटअबूला शिबिरासाठी गेल्या आणि लॉकडाऊनमुळे तिथेच अडकून पडल्या आहेत. इकडे ३ दिवसांपूर्वी त्यांच्या पतींची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे. ते सारखी पत्नीची आठवण काढतात. त्यामुळे पत्नीला माऊंटअबूवरून जळगाव लवकरात लवकर आणण्यात यावे, अशी मागणी कुटुंबीय करत आहे.
पतीवर आयसीयूत उपचार; मात्र, पत्नी अडकली माऊंटअबूत - जळगाव लॉकडाऊन परिणाम
आई घरी परत यावी, म्हणून मुलगा रजनीकांत महाजन यांनी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच मंत्रालयस्तरापर्यंत प्रयत्न केलेत. मात्र, काहीएक उपयोग झाला नाही. त्यामुळे महाजन कुटुंबीय प्रचंड तणावाखाली आहेत. तपासणी करा, क्वारंटाईन ठेवा पण आईला निदान बाबासाठी तरी घरी परत आणा, अशी विनंती त्यांचा मुलगा आणि मुलगी करत आहे.
पुष्पा सुकलाल महाजन (वय 68) या दीड महिन्यांपूर्वी माऊंटअबूला शिबिरासाठी गेल्या आहेत. कोरोनामुळे त्या तिकडेच अडकून पडल्या आहेत. 3 दिवसांपूर्वी त्यांचे पती सुकलाल भिला महाजन (वय 74) यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना उपचारासाठी जळगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. प्रकृती गंभीर असल्याने ते सध्या आयसीयूत ऍडमिट आहेत. पत्नी माऊंटअबूत अडकून पडल्याने त्यांनी मानसिक ताण घेतल्याचे डॉक्टरांचे म्हणणं आहे. अशा परिस्थितीत आई घरी परत यावी, म्हणून मुलगा रजनीकांत महाजन यांनी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच मंत्रालयस्तरापर्यंत प्रयत्न केलेत. मात्र, काहीएक उपयोग झाला नाही. त्यामुळे महाजन कुटुंबीय प्रचंड तणावाखाली आहेत. तपासणी करा, क्वारंटाईन ठेवा पण आईला निदान बाबासाठी तरी घरी परत आणा, अशी विनंती त्यांचा मुलगा आणि मुलगी करत आहे.