जळगाव:आसमानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. जळगाव जिल्ह्याला परतीच्या पावसाने चांगले झोडपले असून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले असून शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. crops under water in Amalner taluk शेतात जाणारी शेत रस्तेही पाण्याखाली गेले असून परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. मात्र पिकांना बसल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान सातत्याने होत असलेल्या अस्मानी संकटामुळे बळीराजा चांगलाच हवालदिल झाला आहे.
Jalgaon Rain: जळगावच्या अमळनेर तालुक्यात शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली - परतीच्या पावसाचा फटका बसला
Jalgaon Rain: आसमानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. जळगाव जिल्ह्याला परतीच्या पावसाने चांगले झोडपले असून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले असून शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. crops under water in Amalner taluk शेतात जाणारी शेत रस्तेही पाण्याखाली गेले असून परतीच्या पावसाचा फटका बसला आहे.
शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसानराज्यभरासह जळगाव जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका बसला असून परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच हैदोस घातला आहे. यापूर्वीच अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र आता परतीच्या पावसाने देखील चांगले झुडपले असून यामुळे शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास देखील हिरवला गेला आहे.
मोठ्या प्रमाणात पिकांची नुकसानगेल्या दोन ते तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अमळनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांची नुकसान झाले असून यात कपाशी, मका, केळी यासह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सातत्याने होत असलेल्या अस्मानी संकटामुळे मात्र बळीराजा हा चांगलाच हवालदार झाला आहे.