महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर हॉकर्सचा हल्ला - howkers attack jalgaon mnc

मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून हॉकर्सवर होणारी कारवाईची मोहीम हातघाईवर आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या महिनाभरात कारवाईसाठी गेलेल्या मनपा कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याची ही तिसरी घटना आहे. गिरणा टाकी परिसरात दररोज 70 ते 80 हॉकर्स आपली दुकाने थाटत असल्याबाबतची तक्रार काही नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे केली होती.

jalgoan mnc
जळगाव मनपा

By

Published : Jun 24, 2020, 6:00 AM IST

जळगाव - शहरातील गिरणा टाकी परिसरात अनधिकृत हॉकर्सवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकावर हॉकर्सने दगडफेक करत हल्ला केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या हल्ल्यात एका हॉकर्सने मनपा कर्मचाऱ्यांवर चाकू उगारल्याने संतापलेले मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनीही हातात दंडुका घेत ‘फिल्मी स्टाईल’ने हॉकर्सला सज्जड दम भरला. या वादामुळे गिरणा टाकी परिसरात तणाव निर्माण झाला होता.

मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून हॉकर्सवर होणारी कारवाईची मोहीम हातघाईवर आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या महिनाभरात कारवाईसाठी गेलेल्या मनपा कर्मचाऱ्यांवर हल्ला होण्याची ही तिसरी घटना आहे. गिरणा टाकी परिसरात दररोज 70 ते 80 हॉकर्स आपली दुकाने थाटत असल्याबाबतची तक्रार काही नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे केली होती. या तक्रारीनंतर मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास मनपाचे पथक गिरणा टाकी परिसरात कारवाईसाठी पोहचले. तेव्हा हॉकर्सची पळापळ झाली. काही हॉकर्सचा माल मनपा कर्मचाऱ्यांनी जप्त केल्यानंतर हॉकर्स आणि मनपा कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला.

हेही वाचा -'राज्यात कोरोना चाचण्या वाढवा, महापालिकांना भरघोस मदत करा'

काही वेळात शाब्दिक वादाचे रुपांतर धक्काबुक्कीत झाले. वाद वाढतच गेल्याने ज्या हॉकर्सचा माल जप्त करण्यात आला त्यापैकी काही हॉकर्सने मनपा कर्मचाऱ्यांवर दगडफेक करायला सुरुवात केली. काही हॉकर्सने थेट हल्ला चढवला. हॉकर्सने दगडफेक सुरु केल्याने भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांची चांगलीच तारांबळ उडाली. वाद वाढत असल्याने ग्राहकांनीही पळापळ सुरु केली.

चाकू उगारताच उपायुक्तांना राग अनावर -

काही हॉकर्सने भाजी कापण्याचा चाकू मनपा कर्मचाऱ्यांवर उगारल्यानंतर उपायुक्त संतोष वाहुळे यांना राग अनावर झाला. उपायुक्तांनी दंडुका हातात घेवून फिल्मी स्टाईलने हॉकर्सला प्रत्युत्तर दिले. तसेच मनपा कर्मचाऱ्यांवर हल्ला केला तर याद राखा, असा सज्जड दम हॉकर्सला दिला. काही वेळात पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचल्यानंतर हॉकर्स पळून गेले.

11 दुकाने सील, 150 हून अधिक हॉकर्सवर कारवाई -

मनपाकडून सुभाष चौक, गिरणा टाकी आणि इस्लामपुरा भागातील सुमारे १५० हॉकर्सवर कारवाई करून, त्यांचा माल जप्त करण्यात आला. यासह गोलाणी मार्केट, बोहरा गल्ली, चौबे मार्केट भागातील 11 दुकाने मनपाकडून सील करण्यात आली. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे तसेच सम-विषम नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details