महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 20, 2021, 12:49 AM IST

Updated : Dec 20, 2021, 1:21 PM IST

ETV Bharat / state

Gulabrao Patil About Hema Malini : 'माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे'

शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील ( Shivsena Leader Gulabrao Patil ) यांनी एकनाथ खडसे यांना बोदवड नगरपंचायत ( Bodwad Nagar Panchayat Election ) प्रचार भरसभेत टोला मारला. माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे ( Roads like Hema Malini's Cheeks ) असल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले. यावर

Gulabrao Patil Statement on Hema Malini
गुलाबराव पाटील हेमा मालिनी

जळगाव - महाराष्ट्रात सध्या नगरपंचायत निवडणुकीची ( Nagar Panchayat elections in Jalgaon ) रणधुमाळी सुरु आहे. नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. यावेळी शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील ( Shivsena Leader Gulabrao Patil ) यांनी एकनाथ खडसे यांना बोदवड नगरपंचायत ( Bodwad Nagar Panchayat Election ) प्रचार भरसभेत टोला मारला. माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे ( Roads like Hema Malini's Cheeks ) असल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना आव्हान आहे, त्यांनी मतदारसंघात येऊन मी केलेला विकास पहावा. हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते मी तयार केले आहे. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, असा सवाल देखील गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

नितेश राणे यांची उंची नाही -

राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवर देखील गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलं. राज्यात पालकमंत्री शिवसेनेचा, नगर विकास मंत्री शिवसेनेचा, आमदार शिवसेनेचा असंच व्हायला हवं, असे गुलाबराव पाटील म्हणाले. नितेश राणे यांची उद्धव ठाकरे यांच्या बाबत बोलण्या एवढी उंची नाही. उद्धव साहेबांच्या वडिलांनी त्यांच्या वडिलांना राजकारणात मोठे केले. त्यामुळे त्यांनी उद्धव साहेबांविषयी बोलू नये. उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी वापरला असे नितेश राणे यांनी म्हटले होते. यावर गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. शनिवारी शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता.

चित्रा वाघ यांची टीका

गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर भाजपकडून आणि इतर महिला नेत्यांकडून तीव्र शब्दात टीका होत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तर थोबाड फोडण्याचा इशारा दिला आहे. तर खा. नवनीत राणा यांनीही गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. दुसरीकडे गुलाबराव पाटील यांनी या सर्व प्रकरणावर पडदा टाकून माफी मागितल्याचे वृत्त आहे.

हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया -

'ड्रीमगर्ल’ बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया ( Hema Malini on Gulabrao Patil Statement) दिली आहे. अशाप्रकारची तुलना यापूर्वीही करण्यात आल्याचे त्यांनी म्हटलं. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यापासून हा ट्रेंड सुरू झाला. त्यानंतर अनेकांनी तो ट्रेंड फॉलो केला. या प्रकारच्या टिप्पण्या योग्य नाहीत, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा -Gold seized : कॉफीच्या बाटल्यांमध्ये लपवलेले ३.८० किलो सोने जप्त

Last Updated : Dec 20, 2021, 1:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details